एक बिबट आणि दोन अस्वल आढळले मृतावस्थेत : चंद्रपूर जिल्ह्यातील घटना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर :
जिल्ह्यातील भद्रावती येथील आयुध निर्माणी प्रकल्पाच्या परिसरात आज सकाळच्या सुमारास  एक बिबट आणि  दोन अस्वल मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आह . एकाच वेळी तीन प्राणी मृतावस्थेत आढळल्याने परिसरात आश्‍चर्य व्यक्‍त केले जात आहे. मागील काही महिन्यांपासून बिबट वाघाचा वावर या परीसरात आहे.परिसरातील नागरिकांनी अनेक वेळा यांचे दर्शन होत असते. त्यामुळे वाघाने या तिघांची शिकार केली असावी असा तर्क लावल्या जात आहे . याआधीही या ठिकाणी वाघाने काही प्राण्यांची शिकार केली आहे. एकाच वेळी तिघांचाही मृत्यू झाल्याने हा शिकारीचा प्रकार असावा आणि विद्युत प्रवाहाच्या माध्यमातून ही शिकार केली असावी अशीही शंका आहे. वनपथक घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास सुरू आहे.
या प्राण्यांचा मृत्यू नक्‍की कशामुळे झाला हे पुढील तपासानंतर सिद्ध होईल. दरम्यान जंगली श्‍वापदांचा मानवी वस्त्यांजवळचा वावर ही दिवसेंदिवस चिंतेची बाब ठरत आहे.  Print


News - Chandrapur | Posted : 2020-02-01


Related Photos