मावळत्या जानेवारी महिन्यात गडचिरोली जिल्हात घडलेल्या महत्त्वपूर्ण घडामोडी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
मावळत्या जानेवारी २०२० या महिन्यात घडलेल्या महत्त्वपूर्ण घटनांचा आढावा प्रसिद्ध करण्यात आला आहे.
- नागरिकत्व विधेयकाच्या समर्थनार्थ गडचिरोली येथे २ जानेवारी २०२० रोजी CAA व NRC (नागरिकत्व विधेयक) च्या समर्थनार्थ विशाल तिरंगा रॅली काढण्यात आली.
- राजीवनगर गावाजवळील निलगिरीच्या झाडाजवळील उजव्या बाजूला दुचाकी वाहनाने राजन्नापल्ली गावातील दोन युवकांचा अपघात झाला. यात ते दोन युवक जखमी झाले.
- ३ जानेवारी रोजी पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणूकीत अजय कंकडालवार हे अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. तर उपाध्यक्षपदी काँग्रेस पक्षाचे मनोहर पाटील पोरेटी हे विराजमान झाले आहेत. शेताच्या बांधावर विकली जाणारी दारू पेठतुकूम मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांनी जप्त केली. देशी दारूच्या १४४ बाटल्या सापडल्या असून ६ कॅन दारू नष्ट केली. 
- धानोरा तालुक्यातील टवीटोला येथे आयोजित क्रीडा स्पर्धांमध्ये खेळाडूंनी सुदृढ राहण्यासाठी ‘धावा आपल्या आरोग्यासाठी’ उपक्रमांतर्गत गुरुवारी मॅराथॉन रनिंग स्पर्धा घेण्यात आली. यात ४० युवक युवतींनी सहभाग घेत निरोगी आयुष्यासाठी धावणे आवश्यक असल्याचा संदेश दिला.
- चोरून लपून खर्रा व इतरही तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करीत असलेल्यांवर अंकुश आणण्यासाठी सोमवार, ६ जानेवारी रोजी सिरोंचा पोलिसांनी सकाळीच धाडसत्र मोहीम सुरू केली. शहरातील पानठेले, चहाटपर्‍या, खाद्यपदार्थ विक्रीचे ठेले पोलिसांनी तपासले.
- अवैधरित्या देशी दारूची विक्री करण्यासाठी चोरट्या मार्गाने वाहतूक करणाऱ्या महिला आरोपीस ३ वर्षांचा कारावास व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा गडचिरोली येथील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी एन. सी. बोरफळकर यांनी सोमवार, ६ जानेवारी रोजी सुनावली आहे.
- गडचिरोली जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष अजय कंकडालवर यांनी सोमवार, ६ जानेवारी रोजी जिल्ह्यातील विकासकामांबाबत पदाधिकारी व अधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
- गडचिरोली जिल्हा परिषदेचे नवनियुक्त अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या अध्यक्षतेखाली ७ जानेवारी रोजी जिल्हा परिषद बांधकाम विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत कंकडालवार यांनी बांधकाम विभागातील कामकाजाचा आढावा घेतला.
- हैद्राबाद येथे कत्तलीसाठी घेऊन जात असलेल्या जनावरांची सुटका, चार आरोपींना अटक केली.
- कोरची परिसरातून मोठ्या प्रमाणात हैद्राबाद येथे जनावरांची वाहतूक करण्यात येणार असल्याबाबत मिळालेल्या गोपनीय माहतीच्या आधारे पोलिसांनी वैरागड टी पाईंट येथे सापळा रचून कत्तलीसाठी जनावरे घेऊन जात असलेले तीन कंटेनर ९ जानेवारी रोजी ताब्यात घेतले.
- चामोर्शी तालुक्यातील सेल्लर येथील मुक्तिपथ गाव संघटनेच्या सदस्यांनी अहिंसक कृतीद्वारे दोघांच्या घरी धाड टाकून प्रत्येक १० लीटर गावठी मोहाची दारू जप्त केली.
- कुरखेडा तालुक्यातील अवैधरित्या उत्खनन करणारे कुंडलिक अंताराम तोंडरे रा.कुरखेडा यांचे ट्रॅक्टर क्रमांक-एम एच ३३ एफ-४०८४,शिवणी कटंगटोला रस्त्यावर १ ब्रास रेती, अविनाश बादलशाहा पदा रा.कोसी यांचे ट्रॅक्टर इंजिन नवीन व ट्राली क्रमांक-एम एच ३३एफ ३९२८,कोसी रस्त्यावर गावात १ ब्रास रेती तसेच देविदास हरिराम सहारे रा.पलसगड यांचे ट्रॅक्टर क्रमांक-एम एच ३३ एफ ५००२ आंजनटोला बायपास रस्त्यावर १ ब्रास मातीसह ट्रॅक्टर पकडण्यात आले.
- गावठी दारूची विक्री करणार्‍यांच्या तिघांच्या घरी पोलिसांच्या सहकार्याने धाड टाकून चातगाव येथील महिलांनी १० हजाराचा दारूसाठा व मोहा जप्त केला.
- बहिणीला मारहाण करणाऱ्या भावास १ वर्षाचा कारावास व ५ हजार रुपये द्रव्य दंडाची शिक्षा सोमवार, १३ जानेवारी रोजी सुनावली आहे.
- माहेरी निघून गेलेल्या पत्नीस व मुलास दिवाळीच्या सणाला घरी घेवून येण्याच्या कारणावरून वडिलाशी भांडण करून काठीने जिवानिशी ठार करणाऱ्या आरोपी मुलास आजीवर कारवास व ३ हजार रुपये दंडाची शिक्षा बुधवार, १५ जानेवारी २०२० रोजी सुनावली आहे.
- देसाईगंज शहरापासून जवळच असलेल्या आमगाव येथील तीन अल्पवयीन मुली नजीकच्या वैनगंगा नदीपात्रात तीळ संक्रांतीच्या निमित्ताने आंघोळ करायला गेल्या असता एक मुलगी पाण्यात वाहुन गेल्याची धक्कादायक घटना बुधवार. १५ जानेवारी २०२० रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडली.
- कुरखेडा तालुका मुख्यालयापासून काही अंतरावर असलेल्या जांभूळखेडा जवळ भरधाव ट्रकने कारला दिलेल्या धडकेत गडचिरोली  जि.परिषदेचे ४ सदस्य जखमी आहेत .  हि घटना आज सकाळी ९. ३० वाजताच्या सुमारास घडली.
- वडसा, आरमोरी ते गडचिरोली मार्गाने अवैधरित्या दारूची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळताच आरमोरी पोलिसांनी तत्काळ गाढवी नदीवर सापडणार रचून ६ लाख २८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
- अहेरी वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या क्र. ६१६ संड्रा या गावातील परिसरात विद्युत तारांच्या साहाय्याने तीन चितळाची शिकार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
- अवैधरित्या विक्रीकरिता दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपीस ३ वर्षांचा सश्रम कारावास व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा मंगळवार, २१ जानेवारी २०२० रोजी सुनावली आहे.
- चामोर्शी तालुक्यातील येनापूर परिसरात पट्टेदार वाघाने धुमाकूळ घातला असून काल २१ जानेवारी रोजी सोमनपल्ली गावालगतच वाघाने बैलाचा फडशा पाडला.
- गडचिरेाली येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चामोर्शीजवळ २८ जानेवारी २०२० रोजी सापळा रचून ११ लाख ७८ हजार रुपये किंमतीची दारू व मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत चार आरोपींना अटक केली.
- कुरखेडा-कोरची मार्गावर असलेल्या बेळगाव घाटावर धान्य वाहून नेणार ट्रक पलटला. सदर ट्रक हे वडसा मार्गे कोरची येथे धान्य वाहून नेत होते. बेळगाव घाटावर  ट्रकचे संतुलन बिघडल्यामुळे सदर अपघात झाला.  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-01-31


Related Photos