जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी घेतली गटविकास अधिकाऱ्यांची आढावा बैठक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
गडचिरोलीचे जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी ३१ जानेवारी २०२० रोजी जिल्हा परिषदेतील कक्षात जिल्ह्यातील गटविकास अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत विविध विकास कामांची व प्रस्ताविक कामांची माहिती जाणून घेतली. जिल्ह्यात काम करताना येणाऱ्या अडचणी, त्यावर उपाययोजना यावरही कंकडालवार यांनी सविस्तर चर्चा केली. जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांना प्राप्त होणारा निधी नियोजित कालावधीत खर्च करावा आणि मंजूर झालेल्या विकास कामांना गती द्यावी, अशा सूचनाही कंकडालवार यांनी या बैठकीत दिल्या. विकासाच्या दृष्टीने गावपातळीवर कोणती कामे करणे अपेक्षित आहेत, कोणती कामे प्रलंबित आहेत याचीही माहिती त्यांनी यावेळी जाणून घेतली. या आढावा बैठकीला जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, इतर पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-01-31


Related Photos