अहेरी जिल्हा निर्माण झाल्यास दारूबंदीचा काय होणार, हटणार की कायम राहणार!


- जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेचा प्रश्न

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
गडचिरोली जिल्ह्याचे विभाजन होऊन नवा अहेरी जिल्हा स्थापन होण्याची जोरदार चर्चा सध्या जिल्ह्यात व राज्यात सुरू आहे. भौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या विभाजनातून अहेरी जिल्ह्याची निर्मिती झाल्यास दारूबंदीचा काय होणार? दारूबंदी हटणार की मग कायम राहणार? असा गंभीर प्रश्न गडचिरोली जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेकडून उपस्थित केला जात आहे. सध्या महाराष्ट्रातील गडचिरोली, चंद्रपूर व वर्धा या तीन जिल्ह्यात शासनाने दारूबंदी केली आहे. मात्र सध्या चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी हटविण्याबाबत समीक्षा समिती नेमण्याची मागणी जोर धरत आहे. अशातच महाराष्ट्रातील काही नव्या जिल्ह्याच्या निर्मितीची जोरदार चर्चा सुरू आहे. यात गडचिरोली जिल्ह्याचे विभाजन करून अहेरी जिल्हा निर्माण करण्यात येणार असल्याबाबतच्या चर्चा रंगत आहेत. सध्या गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी आहे. त्यामुळे या जिल्ह्याच्या विभाजनातून नव्याने उदयास येणारया अहेरी जिल्ह्यात सुद्धा दारूबंदी कायम राहणार की हटणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण सध्या महाराष्ट्रातील तीन जिल्हे वगळता इतर जिल्ह्यात दारूविक्री सुरू आहे. त्यामुळे नव्याने निर्माण होणाऱ्या जिल्ह्यात शासन दारूविक्री सुरू ठेवणार की दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या विभाजनातूनच अहेरी जिल्हा निर्माण होत असल्याने शासन या जिल्ह्यात सुद्धा दारूबंदी करणार काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. नव्याने निर्माण होणाऱ्या जिल्ह्यातील दारूबंदीबाबत शासन काय निर्णय घेते याकडे सुद्धा जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागले आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-01-31


Related Photos