महिला व बालक यांना केंद्रस्थानी मानुन सहकार्य करा : जिल्हाधिकारी दीपक सिंगला


- सर्वसमावेशक महिला जिल्हा सल्लागार समिती बैठकीत सूचना
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
महिला व बालक यांना केंद्रस्थानी मानुन व त्यांचेवरील होणारे आत्याचार, हुंडाबळी, छेडछाड अशा प्रकरणांमध्ये सहकार्य करा अशा सूचना जिल्हयातील संस्थांना जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी दिल्या. सर्वसमावेशक महिला जिल्हा सल्लागार समितीच्या बैठकीत जिल्हयातील सल्लागार समिती सदस्य यावेळी उपस्थित होते. यामधे अशासकीय संस्था, समुपदेशक, संरक्षण अधिकारी, महिला व बालकल्याण अधिकारी , विविध विभागातील महिला प्रतिनिधी यांचा समावेश होता. या बैठकीत सदस्य सचिव जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अतूल भडांगे यांनी सभेतील विषय सादर केले.
या बैठकीत जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी महिलांबाबतत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा घेतला. संरक्षण अधिकारी यांना यावेळी समुपदेशन व त्यांच्या कामांबाबत आवश्यक माहिती गरजूंना वेळेवर द्या असे सांगितले. जिल्हयातील समुपेदशन केंद्रामधील चारही ठिकाणच्या समुपदेशकांचा आढावा त्यांनी घेतला. यामध्ये वडसा, चामोर्शी, गडचिरोली व अहेरी येथील समुपदेशन केंद्रांचा समावेश होता.
आत्याचारीत महिलांना तात्काळ मदत देण्याच्या दृष्टीने पोलीस, समुपेदशन केंद्र यांनी पावले उचलावित. तसेच महिला वसतिगृह, स्वाधार केंद्र अशा ठिकाणी आत्याचारीत महिला अथवा मुलांना आवश्यकतेनुसार तात्काळ आश्रय मिळावा अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. अशा आत्याचारीत महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी त्यांना बचत गट, लघूउदयोग अथवा विविध विभागातील कंत्राटी पदांवर योग्यतेनुसार काम देण्यासाठी काही करता येईल का याबाबत उपस्थितांना सूचना सादर कराव्यात असे जिल्हाधिकारी यांनी बैठकित सांगितले. 
या बैठकीसाठी जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी लामतुरे, सहाय्यक समाज कल्याण अधिकारी विनोद मोहतुरे, जिल्हा माहिती अधिकारी उपस्थित होते.  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-01-31


Related Photos