२० वर्षापासून फरार असलेल्या आरोपीना विशेष पथकाने केली अटक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
मागील वर्षांपासून स्वतःची ओळख लपून विविध गुन्ह्यांत आरोपी असलेल्या व पोलिस आणि न्यायालयाला गुंगारा देणाऱ्या ३ आरोपीना विशेष पथकाच्या पोलिसांनी अटक केली आहे. गंगाराम विस्तारी तलांडी, रा.आलापल्ली, कार्तिक विनोद हलधर, रा.नागेपल्ली व अंताराम काजा परते रा. आलापल्ली अशी अटक करण्यात आलेल्या  आरोपींची नावे आहेत. 
जिल्ह्यातिल  २० ते ४० वर्षांपासून आरोपी सापडत नसल्याने न्यायालयात अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यामुळे प्रकरणांचा न्यायनिवाडा करण्यात अडचणी येत असल्याबाबत न्यायालयाने पोलिस अधीक्षक कार्यालयाला कळविले होते. त्याअनुषंगाने पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून विशेष पथकाची निर्मिती केली. या पथकाने ९५ सुप्त नस्ती प्रकरणातील आरोपींचे निरंतर वॉरंट जारी केले. त्याअनुषंगाने पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेऊन स्वतःची ओळख लपवून इतर विभागातील असल्याचे भासवून आरोपींचा पत्यावर तेथील स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन आरोपींबाबत माहिती संकलित करून  तीन आरोपींना आलापल्ली व गुंडापल्ली येथून अटक केली. तसेच चार आरोपींचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आल्याने त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र प्राप्त करुन न्यायालयास सादर केले.
सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे , अपर पोलीस अधीक्षक, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांनी केली .   Print


News - Gadchiroli | Posted : 2020-01-29


Related Photos