जिल्हा क्रीडा स्पर्धेच्या पूर्वतयारीचा जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार व उपाध्यक्ष मनोहर पोरेटी यांनी घेतला आढावा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन ५ फेब्रुवारी २०२० रोजी आलापल्ली येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार व उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी यांनी सोमवार, २७ जानेवारी २०२० रोजी आढावा बैठक घेतली. या बैठकीत जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा यशस्वीरितया पार पडण्याच्या दृष्टीने चांगली तयारी करण्याबाबत जिल्हा परिषद पदाधिकारी व अधिकारयांशी चर्चा केली. या आढावा बैठकीला जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-01-27


Related Photos