आसाम पोलिसांना मोठे यश : ६४४ दहशतवाद्यांनी केले आत्मसमर्पण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / गुवाहाटी 
: आसाममध्ये बंदी घातलेल्या आठ संघटनेच्या ६४४ दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व दहशतवादी उल्फा, आरएनएलएफ, केएलओ, सीपीआइ (माओवादी), एनएसएलए, एडीएफ आणि एनएलएफबी या संघटनेचे होते. मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमात सर्व दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.
हा दिवस महत्त्वाचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. सात संघटनेच्या ६४४ दहशतवद्यांनी हत्यारांसह आत्मसमर्पण केले. सर्व दहशतवाद्यांकडे एके ४७, एके ५६ सारखे हत्यारे होते.
२०१९ मध्ये २४० हून अधिक दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केले होते. सर्व दहशतवादी गेली  १० वर्षे दक्षिण आसाम, मिझोर आणि त्रिपुरामधील हिंसक घडामोडींमध्ये त्यांचा हात होता.
  Print


News - World | Posted : 2020-01-23


Related Photos