काटोल येथील वनपाल शरद सरोदे अडकला एसीबीच्या जाळ्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर :
वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय काटोल जि. नागपूर येथील वनपाल शरद रामराव सरोदे (५७) ३ हजार ६५० रुपयांची लाच स्वीकारताना २२ जानेवारी २०२० रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. यातील तक्रारदार हे भाटपुरा वार्ड क्रमांक १५ ता. काटोल येथील रहिवासी असून ते खाजगी कंत्राटदार आहेत. तक्रारदाराने ३ डिसेंबर २०१९ रोजी बाभुळखेडा ता. काटोल, जि. नागपूर येथील शेतीमध्ये असलेलरी सागवानाची झाडे शेतीचे मालकाकडून १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करार करून सागवान झाडाची कटाई करण्याची परवानगी मिळविण्याकरिता विनंती अर्ज वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय काटोल येथे सादर केला. सदर अर्जाच्या पडताळणीकरिता व उभ्या झाडाच्या मोक्याचा पंचनामा करण्याकरिता वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय काटोल येथे कार्यरत वनपाल शरद रामराव सरोदे यांनी तक्रारदारास ३ हजार ६५० रुपये लाचेची मागणी केली. मात्र तक्रारदाराची लाच रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर येथे तक्रार केली. त्या तक्रारीवरून २२ जानेवारी रोजी सापळा रचून वनपाल शरद सरोदे यास रंगेहात लाच रक्कम घेताना अटक करून पोलिस स्टेशन काटोल येथे गुन्हा दाखल केला. सदर कारवाई पोलिस अधीक्षक श्रीमती रश्मी नांदेडकर, अप्पर पोलिस अधीक्षक राजेश दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक श्रीमती संजीवनी थोरात, योगिता चाफले, नाईक पोलिस शिपाई रविकांत डहाट, मंगेश कळंबे, रेखा यादव, राजेश बन्सोड यांनी केलेली आहे.
  Print


News - Nagpur | Posted : 2020-01-22


Related Photos