२७ जानेवारीपासून मुंबईत नाईट लाईफ सुरू ; मंत्रिमंडळाने दिली मंजुरी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
  देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत येत्या २७ जानेवारीपासून 'नाइट लाइफ' सुरू होणार आहे. राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतील या योजनेला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. या निर्णयानुसार मुंबईतील हॉटेल्स, रेस्टॉरंट व दुकानं २४ तास सुरू राहणार आहेत. मात्र, पब आणि बारसाठी वेळेची मर्यादा पूर्वीप्रमाणेच कायम राहणार आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख व आदित्य ठाकरे यांनी स्वत: या निर्णयाची माहिती दिली. नाइट लाइफमुळं पोलिसांवर कोणताही ताण येणार नाही. तसंच, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, असं देशमुख यांनी सांगितलं. नाइट लाइफ सुरू झाली तरी पब आणि बारला पूर्वीप्रमाणेच वेळेची मर्यादा राहील. पब आणि बार दीड वाजेपर्यंतच सुरू राहतील, असं त्यांनी स्पष्ट केलं. 'नाइट लाइफ' सुरू होणार असली तरी दुकानं उघडी ठेवण्याची सक्ती कुणावरही केली जाणार नाही. ती बाब पूर्णपणे ऐच्छिक असेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. आठवड्याभरात आस्थापन कोणत्या दिवशी बंद ठेवायचे, याचा निर्णय व्यावसायिकांचा असणार आहे.
  Print


News - Rajy | Posted : 2020-01-22


Related Photos