उद्या गडचिरोली येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे धरणे आंदोलन


- ओबीसी जातनिहाय जनगणनेची मागणी
 विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
१९३१ साली इंग्रज सरकारने ओबीसी हा ५२टक्के आहे अस गोऱ्या लोकांनीं सुधा जाहीर केलं होतं पण भारत देशाच्या स्वातंत्र्या नंतरही ओबीसी समाजाची गणना होत नसल्याने ओबीसी समाजाला संख्याच्या प्रमाणात आरक्षन नाही आणि कुठल्याही क्षेत्रांत ओबीसींना वाटा नाही म्हणूनच ओबीसी समाजाची महाराष्ट्र राज्य बरोबर गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा ओबीसींची सामाजिक , शैक्षणिक व आर्थिक स्तिथी दिवसेंदिवस खालावत आहे ओबीसीं समाजात बेरोजगारी , दारिद्र , शेतकऱ्यांची प्रश्न दिवसेंदिवस वाढत आहे गडचिरोली जिल्ह्यात ओबीसी समाजाची संख्या नसल्याने पैसा कायद्या मुडे नौकर भरतीत ओबीसींना नगण्य स्थान आहे.  पैसा कायदा , बेरोजगार , सामाजिक व शेतकऱ्यांची स्तिथी सुधारण्याकरिता ओबीसी समाजाची गणना होणे आवश्यक आहे.  जर ओबीसी समाजाची जनगणना झाली तर ओबीसी समाजाची ९० टक्के प्रश्न सुटतील असा विश्वास संपूर्ण भारत देशातून ओबीसी समाज व्यक्त करत आहे. ओबीसी जणगणना व ओबीसी आंदोलनाची वेग वाढविण्याकरिता भारत देशा बरोबर गडचिरोली जिल्ह्यात सुधा वेग वाढवली,  ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यासाठी मागील ६ जानेवारी २०२० रोजी देशभरातील सर्व जिल्ह्यात पहिल्या टप्यात निवेदन देण्यात आले होते त्याच प्रमाणे आज दिनांक २० तारखेला सुधा काही जिल्ह्यात आंदोलने करण्यात आले होते व याच मागणी करिता उद्या २१ जानेवारी २०२० ला गडचिरोली तालुक्याप्रमाणे चामोर्शी , धानोरा , आरमोरी अश्या तालुक्यात धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलेले आहे. त्याच प्रमाणे गडचिरोली जिल्ह्यातील संपूर्ण तालुका संघटनेच्या व अध्यक्षाच्या निर्णया नुसार व नियोजना नुसार आंदोलने व निवेदने देण्यात येणार आहे या संपूर्ण आंदोलनास ओबीसी बांधवानी सहभागी होऊन स्वतःच्या न्याय मागण्या पूर्ण करून घ्यावा अशे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघाने केले आहे.   Print


News - Gadchiroli | Posted : 2020-01-20


Related Photos