अहेरी वनपरिक्षेत्रात चितळाची शिकार, चार आरोपी अटकेत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी / अहेरी :
अहेरी वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या क्र. ६१६ संड्रा या गावातील परिसरात विद्युत तारांच्या साहाय्याने तीन चितळाची शिकार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चितळाची शिकार करून मांस शिजवुन खात असताना शनिवारी रात्री चार आरोपींना वन विभागाने ताब्यात घेतले आहे. या परिसरात गेल्या काही दिवसांपासून शिकारीचे प्रमाण वाढलेले आहे. सदर शिकाऱ्यांनी चितळाचे मांस कापून ते शिजवून खाण्याचा प्रयत्न केला. परंतु याची कुजबुज वनविभागाला लागताच वनविभागाने सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. यात दोन आरोपी फरार आहेत. तिरुपती रंगारी, चिंन्ना गावडे, सचिन गावडे, राजू सीडाम असे चार आरोपींचे नावे आहेत. पोलिसांनी आरोपींची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात रवानगी करण्यात आली असून त्यांना सोमवार, २० जानेवारी २०२० ला न्यायालयात हजर करण्यात येण्याची शक्यता आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-01-20


Related Photos