उत्तर प्रदेशमध्ये सामूहिक बलात्कार करून तरूणीचा मृतदेह ॲसिडने जाळला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / लखनऊ :
डॉक्टर प्रियंका रेड्डी यांच्यावर सामूहिक बलात्कार करून त्यांचा मृतदेह जाळल्याच्या घटनेने देशभरात संतापाची लाट उसळली होती. या घटनेच्या दोन महिन्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये अशाच प्रकारची एक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशमधील बाहरिच येथे एका तरुणीवर सामूहिक बलात्कार करून नंतर तिचा मृतदेह ॲसिडने जाळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. जिल्ह्यातील कातारनिया घाट जंगलात तरुणीचा मृतदेह सापडला आहे.
मुर्थिला पोलीस ठाण्यातील पोलिसांना कातारनिया घाट जंगलात एका तरुणीचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली. या तरुणीचा चेहरा ॲसिडमुळे पूर्णपणे होरपळलेला होता. तरुणीची ओळख लपविण्यासाठी तिचा चेहरा पूर्ण जाळला होता. तर शरीरावरही अनेक ठिकाणी जळलेल्याच्या जखमा आहेत. त्या तरुणीची अद्याप ओळख पटलेली नाही. या तरुणीवर सामूहीक बलात्कार झाल्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी एक विशेष तपास पथक स्थापन केले आहे. पोलीस उप अधिक्षकांच्या नेतृत्वाखाली हे तपास पथक तपास करणार आहे. तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून पोलीस तिच्या कुटुंबीयांचा शोध घेत आहे.  Print


News - World | Posted : 2020-01-19


Related Photos