चातगाव वनपरिक्षेत्रात वाघीनीचा मृतदेह आढळला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / अमिर्झा :
गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून १५ ते २० किमी अंतरावर असलेल्या चातगाव वनपरिक्षेत्र व मौशीचक उपवनक्षेत्रात आज १८ जानेवारी ला वाघीन मृतावस्थेत आढळल्याची घटना उघडकीस आली आहे. यामुळे परिसरात खळबळ माजली आहे.
वनविभागास सदर माहीती होताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व मृत वाघाचे शवविच्छेदन करून दहन करण्यात आले असून  नमुने फारेन्सीक लॅब मध्ये पाठविण्यात आले आहे. वाघीनीचा मृत्यु १५ ते २० दिवसअगोदर झाला असावा असा अंदाज लावण्यात येते आहे. सदर वाघीन ही ब्रम्हपूरी वनपरिक्षेत्रातील असल्याचे बोलल्या जात असुन वाघीनीच्या गळयात इलेक्ट्रानिक पटटा लावलेला होता. पुढील तपास गडचिरोली वनविभाग करीत आहे. 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-01-18


Related Photos