गडचिरोली जिल्हा परिषदेवर सर्वपक्षीय सत्ता


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
अडीच वर्षाच्या कालावधीनंतर जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचे आरक्षण बदलले. त्यामुळे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक नुकतीच आटोपल्यानंतर आज, गुरुवार १६ जानेवारी रोजी विषय समिती सभापती पदांची निवडणूक घेण्यात आली. आजच्या सभापती पदाच्या निवडणुकीनंतर गडचिरोली जिल्हा परिषदेवर सर्वपक्षीय सत्ता स्थापन झाली आहे. येथील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी आदिवासी विद्यार्थी संघाचे अजय कंकडालवार तर उपाध्यक्षपदी काॅंग्रेसचे मनोहर पाटील पोरेटी यांची निवड करण्यात आली अणि आज झालेल्या विषय समितीच्या निवडणुकीत बांधकाम सभापतिपदी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे युधिष्ठीर बिश्वास, कृषी सभापतिपदी भाजपाचे रमेश बारसागडे, महिला बालकल्याण सभापतिपदी भाजपाच्या रोशनी पारधी तर समाजकल्याण सभापतिपदी भाजपाच्या रंजिता कोडापे यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे या जिल्हा परिषदेवर आता सर्वपक्षीय सत्ता स्थापन झाल्याचे दिसून येत आहे. अडीच वर्षापूर्वी गडचिरोली जिल्हा परिषदेवर भाजपा व आविसंची सत्ता स्थापन झाली होती. मात्र अध्यक्ष पदाच्या आरक्षण बदलानंतर अध्यक्षपद आविसंच्या तर उपाध्यक्षपद काॅंग्रेसच्या कोट्यात गेले. त्यानंतर विषय समिती सभापती पदाच्या निवडणुकीत भाजपाच्या कोट्यात तीन सभापती पद तर राकाॅंच्या कोट्यात एक सभापती पद गेले. त्यामुळे या जिल्हा परिषदेवर आता कोणत्याही पक्षाची एकहाती सत्ता स्थापन होऊ शकली नाही हे विशेष.  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-01-16


Related Photos