जिल्हा परिषदेच्या सभापतिपदी युधिष्ठीर बिश्वास, रमेश बारसागडे, रोशनी पारधी, रंजिता कोडापे यांची निवड


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
येथील जिल्हा परिषदेच्या चार विषय समिती सभापती पदांच्या निवडीसाठी गुरुवार, १६ जानेवारी २०२० जिल्हा परिषदेच्या शहीद वीर बाबुराव शेडमाके सभागृहात निवडणूक घेण्यात आली. यात बांधकाम सभापतिपती राष्ट्रवादी काॅंग्रेसचे युधिष्ठीर बिश्वास, कृषी सभापतिपदी भाजपाचे रमेश बारसागडे, महिला व बालकल्याण सभापतिपदी भाजपाच्या रोशनी पारधी तर समाजकल्याण सभापतिपदी भाजपाच्या रंजिता कोडापे यांची निवड झाली आहे.
बांधकाम व कृषी समितीच्या सभापती पदासाठी राकाॅंचे युधिष्ठीर बिश्वास, काॅंग्रेसचे रवींद्र शहा, भाजपाचे रमेश बारसागडे, रासपचे अतुल गण्यारपवार हे रिंगणात होते. यात युधिष्ठीर बिश्वास यांना सर्वाधिक २७ मते मिळाली असल्याने त्यांना विषय समिती सभापतिपदी निवड झाली आहे. तर काॅंग्रेसचे रवींद्र शहा व भाजपाचे रमेश बारसागडे यांना प्रत्येकी २४ मते मिळाली. त्यामुळे ईश्वरचिठ्ठीने रमेश बारसागडे यांची निवड करण्यात आली आहे. महिला बालकल्याण सभापती पदासाठी कॅंग्रेसच्या रुपाली पंदिलवार व भाजपाच्या रोशनी पारधी रिंगणात होत्या. यात रोशनी पारधी यांना २५ तर रुपाली पंदिलवार यांना २४ मते मिळाल्याने सभापतिपदी रोशनी पारधी यांची निवड झाली आहे. तसेच समाजकल्याण सभापती पदासाठी काॅंग्रेसचे प्रभाकर तुलावी, काॅंग्रेसचे प्रल्हाद कराडे, भाजपाच्या रंजिता कोडापे हे रिंगणात होते. यात रंजिता कोडापे यांना सर्वाधिक २६ मते मिळाल्याने त्यांची सभापतिपदी वर्णी लागली आहे. सभापती पदाच्या निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषदेत सर्वपक्षीय सत्ता स्थापन झाल्याचे दिसून येत आहे. या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी निवडणूक धनाजी पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुत्तीरकर, किशोर मडावी, अजय बोडणे, विवेक दुधबळे नरेश कनोजिया, संतोष मेश्राम यांनी काम पाहिले.  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-01-16


Related Photos