महत्वाच्या बातम्या

 चंद्रपूर परिमंडळात योजनांची थकबाकी ४१ कोटी ९४ लाखांवर


- वीजबिल वेळेत भरण्याची महावितरणचे कळकळीचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : महावितरण चंद्रपूर परिमंडळात ८ लाख ३१ हजार ४६० ग्राहकांना वीजपुरवठा करतांना अनेक अडचणींचा सामना करण्याची जबाबदारी सुरळीतपणे पार पाडत असतांना अनेक ग्राहकांकडून वीजबिल भरतांना उदासनिता दिसत आहे. त्यामुळे परिमंडळातील चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयातील घरगुती, वाणिज्यिक, औदयोगिक, सरकारी कार्यालये, सार्वजनिक पाणिपुरवठा योजना यांची थकबाकी ४१ कोटी ९४ लाखावर झाली असून थकबाकी वसुलीची कसरत महावितरण अधिकारी व कर्मचारी ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा करतांना करीत आहेत.

चंद्रपूर परिमंडळात चालू वर्षातील व मागील वर्षाच्या एकंदरीत मागणीपैकी घरगुती ग्राहकांकडुन २१ कोटी ८० लाख येणे आहे, तर वाणिज्यिक गाहकांकडुन ५ कोटी ५१ लाख येणे आहे, औदयोगिक ग्राहकांकडुन ६ कोटी २८ लाख थकबाकी वसुली येणे आहे, ग्रामीण व शहरी पाणीपुरवठा योजनांकडून ३ कोटी २ लाख, सरकारी कार्यालये ५ कोटी ३३ लाख असे एकंदरीत ४१ कोटी ९४ लाख येणे आहेत. त्यामुळे थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात येत आहे.

महावितरणचे सर्व अधिकारी व कर्मचारी थकबाकीदारांच्या दारात जावून वीजबिल भरुन घेत आहेत. तर ग्राहकांचा थकबाकीसाठी वीजपुरवठा खंडित करण्यात येवून गैरसोय हेावू नये यासाठी सुट्टीच्या दिवशीही सर्व वीजबिल भरणा केंद्रे सुरु ठेवण्यात आली आहेत.

महावितरणची आर्थिक स्थिती समजून घेवून ग्राहकांनी थकबाकी भरून महावितरण कंपनीला सहकार्य करावे असे विनंतीपूर्वक आवाहन मुख्य अभियंता सुनिल देशपांडे यांनी केले आहे.


चंद्रपूर जिल्हयातील एकूण थकबाकी २९ कोटी ८३ लाख

घरगुती – १५ कोटी, वाणिज्य – ४ कोटी ८१ लाख , औद्योगिक -  ५ कोटी  १९लाख, पाणीपुरवठा योजना – २ कोटी ६९ लाख तसेच  सरकारी कार्यालये व इतर ग्राहक -२ कोटी २६ लाख अशी एकूण- २९ कोटी ८३


गडचिरोली जिल्हयातील  एकूण थकबाकी १२ कोटी ११ लाख

गडचिरोली जिल्हा -

घरगुती ६ कोटी ८० लाख, वाणिज्य -७० लाख, औद्योगिक - १ कोटी १० लाख,  पाणीपुरवठा योजना -३४ लाख, इतर व सरकारी कार्यालये -३कोटी १७ लाख अशी एकूण- १२ कोटी ११ लाख





  Print






News - Chandrapur




Related Photos