कढोली येथील वैनगंगा नदीपात्रात नाव बुडाल्याने दोघांना जलसमाधी, दोघांचेही मृतदेह सापडले


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सावली :
तालुक्यातील कढोली वैनगंगा नदीपात्रात नाव बुडाल्याने नावेत बसून अंत्यविधीसाठी येणाऱ्या आठ लोकांपैकी दोन लोकांना १४ जानेवारी रोजी जलसमाधी मिळाली असून दोघांचेही मृतदेह बुधवारी सापडले आहेत. सावली तालुक्यातील कढोली येथील रामबाई कन्नाके (६५) यांच्या अंत्यविधीसाठी चामोर्शी तालुक्यातील राजगोपालपूर येथील ८ जण नावेत बसून तळोधी घाटावरून ते कढोली घाटाकडे येत असतानां अचानक नाव बुडाली. मात्र नावाडी व इतर ६ जणांना वाचविण्यात गावकऱ्यांना यश आले. मात्र दोघेजण नदीत वाहून गेले. बुडणाऱ्या व्यक्तिचा सुगावा लागला नसल्यामुळे चंद्रपूर व गडचिरोली येथून पाणबुडी बोलविण्यात आले. त्यांचाकडून बेपत्ता असलेले दोघांचे मृतदेह शोधण्याचे काम सुरू केले. मात्र रात्र होत असल्याने शोध कार्यात अडथडा झाल्याचे पुन्हा दुसऱ्या दिवशी कार्य सुरू करण्यात आले. आज सकाळपासून चंद्रपूर रेस्क्यू टिमने शोध मोहीम सुरू केली असता दुपारी २ वाजता नदीतून मृतदेह बाहेर काढण्यास यश आले. त्यावेळी ठाणेदार बाळासाहेब खाडे, नायब तहसीलदार चिडे, कर्मचारी व गावातील नागरिकांची उपस्थिती होती. या घटनेने गावात व परिसरात शोककळा पसरलेली आहे.
  Print


News - Chandrapur | Posted : 2020-01-15


Related Photos