जे पी नड्डा होणार भाजपचे अध्यक्ष, २० जानेवारीला होणार त्यांच्या नावाची घोषणा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा हे भाजपचे अध्यक्ष होणार आहे. २० जानेवारी रोजी त्यांच्या नावाची घोषणा होणार आहे. भाजप अध्यक्षाची निवडणूकीसाठी १९ जानेवारी रोजी नामांकन दाखल केले जातील . सध्या नवीन अध्यक्षाच्या निवडणुकीसाठी प्रक्रिया सुरू आहे.
आज तक या वृत्तवाहिनीने याबाबत बातमी दिली आहे. पक्षाच्या संविधानानुसार ५० टक्क्यांहून अधिक संघटनांची निवडणूक झाल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षासाठी निवडणूक होणार आहे. भाजपचे निवडणूक अधिकारी आणि माजी केंद्रीय मंत्री राधामोहन सिंह हे पुढच्या दोन तीन दिवसांत अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तारीख जाहीर होणार आहे. जे पी नड्डा अध्यक्षपदासाठी अर्ज भरतील आणि तेच अध्यक्ष होतील असे समजले जाते.
२० जानेवारी रोजी भाजपला जे पी नड्डा यांच्या रुपाने नवीन अध्यक्ष मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, भाजप शासित राज्याचे मुख्यमंत्री, कंद्रीय मंत्र्यांसह अनेक प्रदेशाध्यक्ष नड्डा यांच्या नावाला अनुमोदन देतील.
भाजपचे सध्याचे अध्यक्ष अमित शहा यांचा कार्यकल २०१९ च्या जानेवारी महिन्यातच संपला होता. परंतु लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर त्यांना पदावर राहण्यास सांगण्यात आले होते. लोकसभा निवडणुकीनंतर अमित शहा यांनी गृहमंत्रिपदाची शपथ घेतली होती. तेव्हा जे पी नड्डा यांच्याकडे कार्यकारी अध्यक्षपदाचा कार्यभार देण्यात अला होता. जे पी नड्डा हे पुढील भाजपचे अध्यक्ष होणार असून फेब्रुवारी महिन्यात ते पक्षाचा कार्यभार स्विकारतील.  Print


News - World | Posted : 2020-01-14


Related Photos