आलापल्ली येथील दिव्यांग मेळाव्याला जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी दिली भेट


- जिल्हाधिकारी शेखर सिंग यांच्यासोबत केली चर्चा 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
जिल्हा प्रतिनिधी / अहेरी :
महसूल विभाग, पंचायत समिती विभाग आणि आरोग्य विभागाच्या वतीने आलापल्ली येथील महसूल मंडळ कार्यालयात आज १३ जानेवारीला दिव्यांग नागरिकांचे शिबिर व मेळाव्याचे आयोजन आले. या शिबिराला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी भेट देऊन शिबिरात आलेले अपंग व दिव्यांग नागरिकांचे आस्थेने विचारपूस केली . व त्याठिकानी उपस्थित जिल्हाधिकारी शेखर सिंग, अहेरी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ.कन्ना मडावी, तहसीलदार ओंकार ओतारी, प्राथमिक आरोग्य तालुका अधिकारी वानखेडे, डॉ.विशाल येरावार, डॉ.सलूजा यांच्याशी सुद्धा चर्चा केली.
यावेळी पंचायत समिति सभापती भास्कर तलांडे, जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, आलापल्लीचे सरपंचा सौ. सुगंधा मडावी, तानबोडीचे माजी उपसरपंच अशोक येलमूले, प्रशांत गोडसेलवार, राहुल  कोरेत आदी मान्यवर उपस्थित होते.  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-01-13


Related Photos