महत्वाच्या बातम्या

 माता सुरक्षीत तर घर सुरक्षीत अभियाना अतंर्गत रत्नापूरात आरोग्य तपासनी शिबीर संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : तालुक्यातील रत्नापूर येथील प्राथमिक आरोग्य उपक्रेद्र रत्नापूर येथे शासनाच्या माता सुरक्षीत तर घर सुरक्षीत या अभियानाअंतर्गत आरोग्य तपासनी शिबार पार पडले. वरील शिबीरात रक्त तपासणी एच.आय.व्ही तपासणी, थायराईट, एच .बी तपासणी, सर्व उपस्थीत महीला सह 18 वर्षा खालील मुलींची सुद्धा तपासणी करण्यात आली.

वरील या शिबीराचे अध्यक्ष स्थानी सरपंच कविता सावसाकडे ह्या होत्या प्रमुख अतिथी म्हणुन माजी जी. प. चंद्रपूर उपाध्यक्ष कल्पना बोरकर, माजी सरपंच निलीमा गभणे, उपसरपंच अशोक गभणे, उपक्रेंद्रचे डॉक्टर कीर्ती घोनमोडे, आरोग्य सहाय्यक बोरकुटे, भावेश टेभुर्णे, रुपाली बोरकर, योग शिक्षीका वर्षा गायकवाड, सुकेशना बोरकर आदी मान्यवर मंचावर उपस्थीत होते.

उपस्थित मान्यवरानी सर्व महीला व कीशोरवहीन मुलीना निरोगी आरोग्य राहण्यासाठी कशी काळजी घेतली पाहीजे. याबददल सविस्तर तथा विस्तृत मार्गदर्शन केले.

वरील कार्यकमाचे प्रास्ताविक डॉ. कीर्ती घोनमोडे यांनी केले. संचालन आरोग्य सेवक भावेश टेभुर्णे यांनी तर आभार बोरकुटे यांनी मानलेत वरील कार्यक्रमाला आशा वर्कर सुरेखा डेकाटे, कुंदा कोहचाडे, शोभा इचकापे, गिता गहाणे, सुलोचना आयतुलवार यांचे सह बुहु संख्येने माता- महीला व कीशोरवहीन मुली हजर होत्या. आणि आपली तपासणी करुण शिबीर यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.





  Print






News - Chandrapur




Related Photos