क्रीडा क्षेत्रातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो - अजय कंकडालवार


- आलापल्ली येथे केंद्रस्तरीय बालक्रीडा संमेलनाचे थाटात उद्घाटन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी / अहेरी :
क्रीडा गुणांत युवकांचा आत्मविश्‍वास व मनोबल वाढते. शिक्षणासोबतच क्रीडा गुणांची अधिक गरज असून प्रत्येक विद्यार्थ्यांचा क्रीडा व कला गुणातून व्यक्तिमत्व विकास होत असतो, असे प्रतिपादन तालुका क्रीडा सम्मेलनचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार   यांनी केले. अहेरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या १२ केंद्राचे २०१९-२० ज्या शैक्षणिक सत्राचे तालुकास्तरीय शालेय बालक्रीडा व कला संमेलनाचे आयोजन शनिवार, ११ जानेवारी २०२० रोजी आलापल्ली येथील क्रीडा संकुल येथे करण्यात आले होते. यावेळी ते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते. पुढे बोलताना कंकडालवार म्हणाले,  जिल्हा परिषदेअंतर्गत चालणाऱ्या सर्व शाळांना जिथे दुरूस्ती असेल तिथे दुरूस्ती व नवीन वर्ग खोली सुध्दा देण्यात येईल. तसेच सर्व विद्यार्थ्यांना वर्षातून दोन गणवेश देण्याचे काम आपण या ठिकाणी केले आहे. जिल्हा परिषदमार्फत विद्यार्थ्यांना कोणत्याही गोष्टीत आपण कमी पाडू देणार नाही व दोन वर्षापासून जिल्हास्तरीय क्रीडा सम्मेलन होत नाही. त्यामुळे आपण राज्य सरकार किंवा केंद्र सरकार यांच्याकडून निधीची अपेक्षा न करता मी जिल्हा परिषदेच्या जिल्हा निधीतून यावर्षी जिल्हास्तरीय क्रीडा सम्मेलनासाठी निधी उपलब्ध करून देतो, असे खात्रीपूर्वक आश्वासन दिले.
या बालक्रीडा संमेलनाचे उद्घाटन आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचा हस्ते करण्यात आले. या सम्मेलनाला विशेष अतिथी म्हणून अहेरी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे, उपसभापती गीताताई चालूरकर, जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, पं. स. सदस्य शितलताई दुर्गे, पं. स. सदस्य योगीताताई मोहूर्ले, पं. स. सदस्य छायाताई पोरतेट, पं. स. सदस्य हर्षवर्धन आत्राम, आलापल्लीच्या सरपंच सुंगधा मडावी, उपसरपंच पुष्पांताई आलोने, ग्रा. पं. सदस्य रेणुका कूड़मेथे, कैलाश कोरेत, श्रीमती कोडापे, रवि मुपीडवार, अशोक येलमूले आदी  मान्यवर मंचावर उपस्थित होते. ११ ते १३ जानेवरीपर्यंत चालणाऱ्या तीन दिवसीय तालुकास्तरीय बालक्रीडा कला व सांस्कृतिक संमेलनात वैयक्तिक आणि सांघिक खेळ खेळले जाणार आहेत. केंद्र स्तरीय क्रीडा संमेलनात मान्यवरांच्या स्वागतासाठी विशेष तयारी करण्यात आली होती. मान्यवरांचे आगमन होताच ढोल ताशांद्वारे तर शिक्षकांनी फुले उधळून मान्यवरांचे स्वागत केले. केंद्रस्तरीय क्रीडा संमेलनात शिक्षक, शिक्षिका आणि गावकऱ्यांचे खूप मोठे सहकार्य लाभले. या सम्मेलनाचे प्रास्ताविक गटशिक्षण अधिकारी श्रीमती निर्माला वैद्य यांनी केले.



  Print






News - Gadchiroli | Posted : 2020-01-11






Related Photos