प्रत्येक बालकास पोलीओ डोस मिळतील याची खात्री करा : जिल्हाधिकारी शेखर सिंग


- १९ जानेवारी ला पल्स पोलिओ लसीकरण मोहिम
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
पल्स पोलिओ लसीकरण मोहिम अंतर्गत जिल्हयात असणारे प्रत्येक पात्र बालकास पोलिओ डोस दिले जातील याची खबरदारी आरोग्य विभागाने घ्यावी अशा सुचना जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात  ०८ जानेवारी  २०२० रोजी आयोजित पल्स पोलिओ लसीकरण समन्वय समितीच्या सभेमध्ये दिल्या. पल्स पोलिओ लसीकरण मोहिम २०१९ -२० अतंर्गत १९ जानेवारी २०२० रोजी लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात जिल्हा पल्स समन्वय पल्स पोलिओ मोहिम बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस अतिरीक्त  जिल्हा शल्य चिकित्सक,  श्रीमती डॉ. माधुरी किलनाके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशीकांत शंभरकर,  वैद्यकीय अधिक्षक डॉ. दिपचंद सोयाम प्रामुख्याने उपस्थित होते. तसचे सभेला पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेशीसंबंधित सर्व यंत्रणाचे कार्यालय प्रमुख उपस्थित होते. 
पल्स पोलिओ मोहिमेबाबत डॉ. साजिद सर्वेलंस वैद्यकीय अधिकारी नागपूर यांनी PPT द्वारे पल्स पोलिओ मोहिमेबाबत माहिती दिली. चालु वर्षात दिनांक  १० मार्च २०१९ रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे विशेष सत्र राबविण्यात येत असून पल्स पोलिओ लसीकरण मोहिम २०१९ -२० अतंर्गत १९  जानेवारी २०२० रोजी लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. जिल्हयातील ०-५ वर्ष वयोगटातील  ९०३५३ अपेक्षित लाभार्थी आहेत. याकरीता ग्रामीण भागात २०७५ व शहरी भागात ४८ असे एकूण २१२३ लसीकरण बुथ आहेत. आवश्यक पोलिओ मात्रा ग्रामीण व शहरी मिळूण ११७७८४ लस मात्रा उपलब्ध आहे. तसेच पल्स पोलिओ मोहिमेकरीता एकूण ६४४० मनुष्यबळ उपलब्ध आहे . तसेच पल्स पोलिओ Action Plan सादर करण्यात आला आहे अशी माहिती डॉ. सुनिल मडावी , जिल्हा माता बाल संगोपण  अधिकारी यांनी दिली.   तालुका स्तरावर पल्स पोलिओ टास्क फोर्स सभा घेण्यात यावी व शाळा स्तरावर प्रभातफेरी व तालुका व गावस्तरावर मोहिमेचा प्रसार करण्यात यावा. ( ० ते ५ ) वर्षे वयोगटातील सर्व  बालकांना पोलिओ लसीच्या मात्रा देण्यात येणार आहेत. या मोहिमेच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या तयारीचा आढावा बैठकीत सुचना देण्यात आले . 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2020-01-10


Related Photos