शौचालय नसल्याच्या कारणाने ग्रामपंचायत डोंगरगाव (भुसारी) येथील उपसरपंच सौ. भाग्यश्री भगवान ढोरे पदावरून पायउतार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / आरमोरी :
तालुक्यातील डोंगरगाव भुसारी येथील ग्रामपंचायतचे उपसरपंच भाग्यश्री भगवान ढोरे यांना  २८ डिसेंबर २०१९ रोजी शौचालय नसल्याच्या कारणावरून उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य पदावरून जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी पायउतार केले आहे.
सविस्तर वृत्त असे की ग्रामपंचायत डोंगरगाव भुसारी च्या सन २०१५ च्या निवडणुकीत निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्य सौ. भाग्यश्री भगवान ढोरे ग्रामपंचायत सदस्य असून या विद्यमान उपसरपंच होत्या. त्यांनी सन २०१५ च्या निवडणुकीत नामनिर्देशनपत्र भरतेवेळी ग्रामपंचायत डोंगरगाव भुसारी यांचेकडून खोटे व बनावट शौचालय असल्याबाबतचे प्रमाणपत्र जोडले होते. वास्तविक पाहता भाग्यश्री ढोरे याच्याकडे शौचालय नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस, कोणतेही शौचालय नव्हते. त्या अनुषंगाने २१ ऑगस्ट २०१८ च्या ग्रामसभेत सदर विषय उपस्थित करून भाग्यश्री ढोरे ह्या उघड्यावर शौचास जात असताना सुद्धा तिने आपल्या ग्रामपंचायत निवडणुकीत नामनिर्देशन पत्रासोबत सचिव ग्रामपंचायत डोंगरगाव भुसारी याने शौचालय असल्याबाबत खोटे प्रमाणपत्र दिले होते. त्याबाबत अर्जदार राजू हिरामण कुत्तरमारे रा.डोंगरगाव यांनी सचिवास विचारणा केली असता त्यांनी भाग्यश्री ढोरे यांच्या कडे शौचालय नसल्याचे मान्य करून. शौचालय नसल्याबाबतचे २४ ऑगस्ट २०१८ रोजी सहीनिशी प्रमाणपत्र दिले आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम १४ (१)(ज-५) अंतर्गत सदस्यत्व रद्द होण्यास पात्र आहे. असा युक्तिवाद अर्जदार राजू कुत्तरमारे यांनी सादर केला होता.
यावर जिल्हाधिकारी गडचिरोली शेखर सिह यांनी अर्जदार व गैरअर्जदार भाग्यश्री भगवान ढोरे यांचे युक्तिवाद ऐकून घेऊन महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम १४ (१)(ज-५) अंतर्गत सदस्यत्व रद्द करण्यासाठी पुरेशी कारण दिसून आल्याने जिल्हाधिकारी शेखर सिह यांनी  कलम १६ (२) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून भाग्यश्री भगवान ढोरे यांच्या सदस्य व उपसरपंच पदावरून पायउतार केले आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-01-10


Related Photos