जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केली शालेय क्रीडा स्पर्धांबाबत चर्चा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी जिल्ह्यात घेण्यात आलेल्या व घेण्यात येणार असलेल्या शालेय विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धांबाबत पदाधिकारी व अधिकाऱ्यांशी गुरुवार, ९ जानेवारी २०२० रोजी सविस्तर चर्चा केली. शालेय विद्यार्थ्यांच्या बौद्धीक प्रगतीसाठी शारीरिक विकास होण्यासाठी शालेय स्तरावर बालक्रीडा व कला संमेलनाचे आयोजन करणे आवश्यक असून या स्पर्धांच्या सुनियोजित आयोजनाबाबत आणखी काही सुधारणा करता येतील काय याबाबतही अजय कंकडालवार यांनी चर्चा केली. आगामी काळात अशा क्रीडा स्पर्धांमध्ये शालेय विद्याथ्र्यांचा अधिकाधिक सहभाग वाढविण्यासाठी आणि त्यांच्याअंगी असलेल्या सुप्तगुणांना वाव देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगून जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी यांच्यासह इतर पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
News - Gadchiroli | Posted : 2020-01-09