पश्चिम बंगालमध्ये हैदराबाद बलात्कार व हत्या प्रकरणाची पुर्नरावृत्ती : तीन नराधमांना अटक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / कोलकाता :
पश्चिम बंगालमधील दिनाजपूर जिल्ह्यात हैदराबाद येथील सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणाची पुर्नरावृत्ती झाल्याचे समोर आले आहे. दिनाजपूर येथे रविवारी एका अठरा वर्षीय तरुणीवर तीन नराधमांनी लैंगिक अत्याचार केला. ती बेशु्द्ध झाल्यावर नराधमांनी तिच्या अंगावर पेट्रॉल ओतले व तिला जिवंत जाळले. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. तीनही आरोपींचे वय २० ते २२ वर्ष आहे.
महबूब मिया, गौतम बर्मन आणि पंकज बर्मन अशी त्यांची नावे आहेत. प्राथमिक माहितीत आरोपी महबूब बरोबर तरुणीचे प्रेमसंबंध असल्याचे समोर आले आहे. रविवारी महबूबने तिला पाच वाजता भेटण्यास बोलावले. महबूबने सांगितलेल्या ठिकाणी तरुणी पाच वाजता पोहचली. तेव्हा तिथे महबूबचे पंकज आणि गौतम हे दोन मित्रही असल्याचे बघताच ती रागावली. यावरून तिची व महबूबची बाचाबाचीही झाली. त्यानंतर चिडलेल्या महबूब व त्याच्या दोन मित्रांनी  तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. यादरम्यान ती बेशु्द्ध झाली. त्यानंतर महबूब व त्याच्या दोन मित्रांनी तिच्या अंगावर रॉकेल ओतले व तिथून पळ काढला. तरुणी रात्री उशीरापर्यंत घरी न परतल्याने घरातल्यांनी तिची शोधाशोध सुरू केली. पण तिचा ठावठिकाणा न सापडल्याने त्यांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार केली. पोलिसांनी तिच्या मोबाईल रेकॉर्डवरून महबूब व त्याच्या दोन मित्रांना अटक केली.  Print


News - World | Posted : 2020-01-08


Related Photos