जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केली जिल्ह्यातील विकासकामांबाबत चर्चा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
गडचिरोली जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष अजय कंकडालवर यांनी सोमवार, ६ जानेवारी २०२० रोजी जिल्ह्यातील विकासकामांबाबत पदाधिकारी व अधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा केली. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीकोनातून आगामी काळात करावयाच्या उपाययोजना व नियोजन याबाबत चर्चा करून पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारयांचे म्हणणे ऐकून घेतले. जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या शिक्षण, आरोग्य, बांधकाम, कृषी व पशुसंवर्धन विभागातील विविध समस्या कंकडालवार यांनी यावेळी जाणून घेतल्या. जिल्ह्यातील विविध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे, सोयी सुविधा याबाबतही माहिती जाणून घेतली. जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने करावयाची कामे, प्रलंबित असलेली कामे व कार्यान्वित असलेल्या कामांचाही आढावा यावेळी त्यांनी घेतला. आगामी काळात जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीनेे काय उपाययोजना करता येईल व शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी कसा मंजूर करवून आणता येईल याबाबतही चर्चा केली. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, जिल्हा परिषद सदस्य अनिल केरामी, किरण ताटपल्लीवार, श्रीकांत बंडमवार यांच्यासह पदाधिकारी व विविध विभाागचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-01-06


Related Photos