CAA व NRC च्या समर्थनार्थ गडचिरोली येथे २ जानेवारीला विशाल रॅलीचे आयोजन


- खा. अशोक नेते व राष्ट्रीय एकता मंचच्या पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषदेत माहिती

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
CAA व NRC च्या समर्थनार्थ २ जानेवारी २०२० रोजी गडचिरोली येथे विशाल रॅलीचे आयोजन करण्यात आहे आहे. या गल्लीमध्ये  नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार व राष्ट्रीय एकता मंचच्या पदाधिकाऱ्यांची सोमवार, ३० डिसेंबर २०१९ रोजी येथील इंदिरा गांधी चौकातील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेतून केले आहे. या पत्रकार परिषदेला राष्ट्रीय एकता मंचचे जिल्हा संयोजक रामायण खटी, उपाध्यक्ष गोविंद सारडा, भाजपचे ज्येष्ठ नेते व नगरसेवक प्रमोद पिपरे, न. प. उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, न. प. बांधकाम सभापती आनंद शृंगारपवार, पं. स. उपसभापती विलास दशमुखे, दलित आघाडीचे महामंत्री जनार्धन साखरे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी खासदार अशोक नेते यांनी नागरिकत्व विधेयकाबद्दल माहिती देताना म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशहित लक्षात घेऊन CAA (नागरिकता संशोधन विधेयक ) पारित केलेला आहे. तसेच आगामी सत्रात NRC बिल येणार आहे. आजच्या स्थितीत देशहितासाठी सदर कायदे अत्यंत महत्त्वाचे व सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. या दोन्ही कायद्याच्या समर्थनार्थ गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांनी रॅलीचे आयोजन केलेले आहे. या रॅलीत सहभागी होऊन आपल्या देशाप्रती देशभक्ती व्यक्त करावी, असे खासदार अशोक नेते यांनी केले. तसेच या कायद्यामुळे देशातील नागरिकांना कोणतेही नुकसान न होता देशातील एकता, अखंडता कायम ठेवून देशातील जनतेला ताठ मानाने जगण्याचे स्वाभिमान प्राप्त होणार आहे, असेही यावेळी खासदार अशोक नेते यांनी सांगितले.
यावेळी रामायण खटी म्हणाले की, CAA व NRC च्या समर्थनार्थ गडचिरोली शहरातील मूल मार्गावरील अभिनव लाॅन परिसरातून विशाल रॅली काढून शहरातील मुख्य मार्गाने फिरविण्यात येणार आहे. त्यानंतर अभिनव लाॅन येथे या रॅलीचा समारोप करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात येईल. या रॅलीच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत चांगला संदेश पोहचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. अल्पसंख्यकांना भडकावून खोटा संदेश पोहचविण्याचा काही राजकीय लोकांचा डावपेच आहे. त्यामुळे खर काय आहे याची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी या रॅलीचे आयोजन केल्याची माहिती रामायण खटी यांनी या पत्रकार परिषदेत दिली आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-12-30


Related Photos