महत्वाच्या बातम्या

 एटापल्ली तालुक्यातील गेदा येथे किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : आदर्श मित्र मंडळ, पुणे आणि लक्ष्मी नृसिंह पतसंस्था, बल्लारपूर यांचे सहकार्याने तथा अभिनव बहुउद्देशीय कला मंच, गडचिरोली यांचे वतीने गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील गेदा येथे २७ नोव्हेंबर २०२२ ला आदिवासी भागातील महिला/किशोरवयीन मुलींना मासिक पाळी बाबत व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन व कापडी सॅनिटरी पॅड तयार करण्याचे प्रशिक्षण प्रेमिला कुमोटी, प्रशिक्षीका, गडचिरोली यांचे कडून देण्यात आले.  तसेच कुर्मा घरावर सोलर पॅनल बसविणे, एल.ई.डी.लाईट, पॅन, पाणी साठवण हौद, बकेट, मग्गा, आणि २- पलंगाची व्यवस्था करुन कुर्मा घराचे नुतनीकरण करण्यात आले. 

त्याकरिता उदय जगताप, आदर्श मित्र मंडळ, पुणे आणि डाॅ. सलूजा, आलापल्ली यांचे मार्गदर्शनात अकिल शेख सचिव-अभिनव बहुउद्देशीय कला मंच, गडचिरोली यांचे नियोजनानुसार व चेतन गायकवाड, आलापल्ली यांनी पुढाकार घेतला तसेच सौ.रजनी वैरागडे सदस्य ग्रामपंचायत गेदा, मिरवा पदा सदस्य ग्रामपंचायत गेदा, तेलामी सदस्य ग्रामपंचायत गेदा, तारा वैरागडे अंगणवाडी सेविका माधुरी गड्डमवार, अंगणवाडी सेविका, दिपीका सुरजागडे, आशा वर्कर, साखरे, लिपिक, ग्रामपंचायत, गेदा तसेच महिला बचत गटाच्या सदस्या, गावातील किशोरवयीन मुलीं, आश्रम शाळा, गेदा येथील गृहपाल आणि विद्यार्थ्यांनी यांनी हिरीरीने सहभाग घेतल्यामुळे कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यात आला.





  Print






News - Gadchiroli




Related Photos