१ कोटी २२ लाख रुपयांची अपसंपदा जमविल्याप्रकरणी आरटीओ विभागाच्या अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल


- लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर :
लोकसेवक पदाचा दुरूपयोग करून गैरमार्गाने १ कोटी २२ लाख २५ हजार ६४१ रुपयांची अपसंपदा जमविल्याप्रकरणी उपप्रादेशिक परिवहन विभाग नागपूर येथील सहायक मोटार वाहन निरीक्षक मिथून रामेश्वर डोंगरे याच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २७ डिसेंबर २०१९ रोजी गुन्हा नोंद केला आहे. नागपूरचे तत्कलीन सहायक मोटार वाहन निरीक्षक मिथून डोंगरे यास २४ एप्रिल २०१८ रोजी २ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले होते. त्यावेळी घेण्यात आलेल्या त्याच्या घराच्या झडतीत १ कोटी ७१ लाख रुपयांची मालमत्ता आढळून आली होती. त्यावरून लाचलुचपत नागपूर विभागाने मिथून डोंगरे याची उघड चैकशी सुरू केली होती. चौकशीमध्ये संबंधित बॅंका, वित्तीय आस्थापना, दुयम निबंधक कार्यालय, प्रादेशिक परिवहन कार्यालय आदींकडून सविस्तर माहिती प्राप्त करून दस्तऐवजांची बारकाईने तपासणी करण्यात आली. ज्यात त्यांचे उत्पन्नांचे सर्व स्त्रोत व अचल संपत्ती तपासण्यात आली. डोंगरे याने नोकरीच्या अल्प कालावधीत आपच्या पदाचा दुरुपयोग करूून १ कोटी २२ लक्ष २५ हजार ६४१ रुपयांची अपसंपदा जमा केली असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्याविरुद्ध पोलिस स्टेशन काटोल, जि. नागपूर नागपूर येथे अपराध क्र. ९१३/१९ कलम १३ (१) (ई), सहकलम १३ (२) लाप्रका १९८८ अन्वये २७ डिसेंबर २०१९ रोजी गुन्हा नोंदविण्यात आला. डोंगरे याने आतापर्यंतच्या कार्यकाळात मुंबई व नागपूर या ठिकाणी सहायक मोटर वाहन निरीक्षक या पदावर कार्य केले आहे. सदर कारवाई पोलिस अधीक्षक श्रीमती रश्मी नांदेडकर, अप्पर पोलिस अधीक्षक राजेश दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक सारंश मिराशी, पोलिस हवालदार दिनेश शिवले, नाईक पोलिस काॅन्स्टेबल मंगेश कळंबे, रविकांत डहाट यांनी केली आहे.  Print


News - Nagpur | Posted : 2019-12-27


Related Photos