सावली येथे वाहनासह १२ लाख ३८ हजार रुपयांचा सुगंधित तंबाखू जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / सावली :
तालुक्यातील खेडी फाटा जवळ २४ डिसेंबर ला अशोक लेलंड कंपनीचे वाहनामध्ये ६ लाख ३८ हजार ४०० रुपयांचा सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला. मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन मौजा खेडी फाटा येथे नाकेबंदी केली असता एक संशयित वाहन अशोक लेलंड कंपनी क्र.एमएच ३४ बीजी १००९ हे मुल कडून येतांना दिसले त्यास थांबवून वाहनाची झडती घेतली असता त्यात सुगधींत तंबाखू एकूण २४ बॉक्स व ४ प्लास्टिकच्या चुंगड्या,१ पानपराग पान मसालाने भरलेला बॉक्स, २ विमल पान मसालाने भरलेला प्लास्टिक चुंगड्या मिळून आल्या. त्या अनुसंगाने अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन चंद्रपुर यांना पत्र व्यवहार करण्यात आला व  काल २६ डिसेंबर ला अन्न सुरक्षा अधिकारी प्रवीण अ. उमप अन्न व औषध प्रशासन चंद्रपुर हे पोलीस स्टेशनला हजर होऊन जप्ती पंचनामा कारवाई केली असता त्यात हुक्का शीशा तंबाखू मज़ा १०८, २०० ग्रामचे एकूण ८०० टिन किंमत ४ लाख ४० हजार रूपये , हुक्का शीशा तंबाखू मज़ा १०८, ५०० ग्रामचे ८० बॉक्स किंमत १ लाख १२ हजार रूपये , हुक्का शिशा तंबाखू ईगल ४०० ग्रामचे १६० पॅकेट किंमत ६२ हजार ४०० रूपये , पान पराग पान मसाला ९० ग्रामचे १०० पॉकेट किंमत १२ हजार रूपये ,  विमल पान मसाला १२० ग्रामचे १०० पॉकेट किंमत १२ हजार रूपये व वाहतुकीसाठी वापरलेल्या वाहनाची किंमत अंदाजे ६ लाख  रूपये असा एकूण १२ लाख ३८ हजार ४०० रूपयेचा सुगंधित तंबाखू व वाहन असल्याचे आढळून आले. पुढील कार्यवाईसाठी सदरचा तंबाखूजन्य पदार्थ हा अन्न सुरक्षा अधिकारी चंद्रपुर यांचे ताब्यात देण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस स्टेशन सावली येथील पोहवा चंद्रकांत कन्नाके, पोशी सुमित मेश्राम, पोशि प्रफुल आडे, पोशि अविनाश बांबोळे,पोशि श्रीकांत वाढई यांनी केली असून सी.ए.अहवाल प्राप्त होताच पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे .   Print


News - Chandrapur | Posted : 2019-12-27


Related Photos