धोडराज पोलीस स्टेशन समोरील नागरिकांचे आंदोलनाने केले तीव्ररूप धारण


- अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. मोहीतकुमार गर्ग यांनी आंदोलनस्थळी येऊन ऐकले लोकांचे म्हणणे

- आश्वासनानंतर शांत झाले नागरिक

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड :
अबुझमाड जंगल परिसरात पोलिसांनी खोटी चकमक दाखवून दोन आदिवासी इसमांची हत्या केल्याने नेलगुंडा परिसरातील ८ ते १० गावातील  बहुसंख्य  नागरिकांनी एकत्रित येत धोडराज पोलिस स्टेशन गाठून पोलिसांनी केलेल्या अत्याचाराविरोधात मंगळवार, २४ डिसेंबर रोजी ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनाने बुधवारी तीव्ररुप धारण केल्याने पोलिस विभाग व प्रशासनात एकच खळबळ उडाली. दरम्यान, नेलगुंडा परिसरातील लोकांनी आम्हाला शांततेने जगू द्या, अशी मागणी करीत अत्याचार थांबविण्याची मागणी केली. या आंदोलनाची पोलिस प्रशासनाने दखल घेत गडचिरोलीचे अप्पर पोलिस अधीक्षक डाॅ. मोहिमकुमार गर्ग यांनी आंदोलनस्थळी जावून न्याय मिळवून देण्याचे व दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे आदिवासींनी आपले आंदोलन मागे घेतले.
मंगळवारी सायंकाळीपासून सुरु झालेले आंदोलनाला बुधवारी तीव्ररूप धारण केले होते. आदिवासींना जगु द्या, अत्याचार बंध करा.  अश्या घोषणांनी धोडराज पोलीस मदत केंद्रासमोरिल मैदान दणाणले होते. पोलीस व नक्षल चकमक २७ नोव्हेंबर २०१९ ला झाली त्या चकमकीत एकही नक्षल मारला गेला नाही. परंतु पोलीस जवानानी नेलगुंडा व मोरोमेटा येथील रहिवासी असलेले प्रकाश चुकु मुहंदा व राजू दसा पुसाली यांना ३० नोव्हेंबर २०१९ रोजी मारुण नक्षल मारल्याची खोटी बातमी शासनस्तरावर आपली पाठ थोपाटून घेतली. मात्र प्रकाश व राजू हे दोघेही सर्वसामान्य शेतकरी होते. त्यांच्या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे, अशी माहिती हजारोंच्या संख्येत आलेल्या लोकांनी तीव्र शब्दात निषेध करीत न्यायाची मागणी करीत जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक हे या ठिकाणी येऊन न्याय द्यावा, अशी मागणी केली. परंतु त्यांच्या ठिकाणी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. मोहीतकुमार गर्ग हे आंदोलनस्थळी येऊन लोकांचे म्हणणे ऐकून घेतले आणि निवेदन स्वीकारले व आंदोलनकर्त्यांना आश्वश्त केले आणी योग्य व निपक्षपणे चौकशी करुण दोशीवर कार्यवाही करून उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आश्वाशन दिले आहे व अन्याय झालेल्या कुटुंबियांना पोलीस विभागाकडून सर्वोतोपरी मदत करण्याचे ग्वाही दिले. आंदोलनस्थळी नेलगुण्डा, मिलादपली, भटपर, परायनार, पेंगुण्डा, घोटपाडी, कवंडे, मर्दमालेंगा, इरपनार, लाहेरी, जुव्वी, दरभा, गोलागुडा, झारेगुड़ा अश्या अनेक गावातील लोकांनी आपआपली कुटुम्ब व लहान मुलांना घेऊन धोडराज पोलीस मदत केंद्रावर धड़क देत पोलीस व नक्षल चकमकीत नक्षल मारले नसुन निष्पाप लोकांचा जीव पोलिसांनी घेतला असून प्रकाश व राजूच्या कुटुंबियाना न्याय मिळवून देण्याकरिता पुढे सरसावले होते. न्याय मिळेपर्यन्त हा संघर्ष सुरु राहील,  असा पवित्र लोकांना घेतला होता. यातून खरोकरच प्रकाश व राजूला न्याय मिळेल काय? अशी चर्चा व्यक्त होत आहे. निवेदन दिल्यानंतर लोकांनी एका ठिकाणी बसून चर्चा केली व आपआपल्या गावाला परत गेले.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-12-25


Related Photos