आश्रमशाळा अधीक्षकाची शाळेच्या आवारात गळफास घेऊन आत्महत्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर :
  जिल्ह्यातील जिवती तालुक्यात पिट्टीगुडा येथील खेमाजी नाईक आश्रमशाळेच्या अधीक्षकाने शाळेच्या आवारात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
सुभाष पवार (४२) असे  आत्महत्या करणाऱ्या अधीक्षकाचे  नाव आहे. संस्थाचालकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा मृताच्या नातेवाईकांचा आरोप असून, तशी चिठ्ठीही सापडल्याचे  सांगितले जात आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.

 



  Print






News - Chandrapur | Posted : 2019-12-25






Related Photos