हर्षवर्धन श्रिंगला भारताचे नवे परराष्ट्र सचिव


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
भारताचे अमेरिकेतील राजदूत हर्षवर्धन श्रिंगला हे देशाचे नवे परराष्ट्र सचिव होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट समितीने हा निर्णय घेतला. श्रिंगला हे सध्याचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांच्याकडून २९ जानेवारी रोजी पदभार स्वीकारणार आहेत.
१९८४ च्या बॅचचे अधिकारी असलेले हर्षवर्धन श्रिंगला यांनी आपल्या ३५ वर्षांच्या कारकीर्दीत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या  पार पाडल्या आहेत. बांगलादेश आणि थायलंडमध्येही भारताचे उच्चायुक्त म्हणून त्यांनी काम केले आहे. याशिवाय दक्षिण आफ्रिका, इस्रायल आणि व्हिएतनाम या देशांमध्येही महत्त्वाच्या पदांवर काम करण्याचा त्यांना अनुभव आहे.  Print


News - World | Posted : 2019-12-24


Related Photos