महत्वाच्या बातम्या

 संविधान दिनाचा औचित्य साधून महागाव (बूज) येथे नवीन ग्रामपंचायत भवनाचे थाटात लोकार्पण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / अहेरी : पंचायत समिती अहेरी अंतर्गत येत असलेल्या महागाव (बूज) येथे नवीन ग्रामपंचायत भवनाचे थाटात लोकार्पण शंकर एन झाडे, नारायण गंगाराम अलोणे, व्येकटी गंगा वेलादी या जेष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी महागाव (बूज) पुष्पा दुर्गा मडावी सरपंचा, संजय चंद्रा अलोणे उपसरपंच, विनायक बाबुराव वेलादी सदस्य, लालू रामय्या वेलादी सदस्य, दीपाली चंद्रा कांबळे सदस्या, शोभा सुरेश तलांडे सा.स. समिती अध्यक्ष, डॉ. विशाल येर्रावार प्राथमिक आरोग्य केंद्र महागाव (बूज), शंकर पी. कुंभारे, लक्ष्मण चिंतावार, रवी नेलकुद्री भाजपा तालुका अध्यक्ष अहेरी, महेश अलोणे, अंकित गोगले, सचिन करमे, निखिल रामटेके, राजेश करमे, मल्लेश मिसलवार, मल्लेश रामटेके, व्येकटेश चिंतावार, मनीषा रामटेके, पुष्ममाला ओंडरे, रुपेश अलोणे, नक्षत्रा ओंडरे, बापू आलाम, यांच्यासह सर्व ग्रामपंचायत कर्मचारी व गावातील नागरिक उपस्थित होते. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos