दिल्लीत इमारतीला आग : ९ जणांचा होरपळून मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
दिल्लीतील किरारा भागात एका इमारतीला लागलेल्या आगीत नऊ जणांचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले आहेत. रविवारी रात्री १२. ३० च्या सुमारास ही आग लागली होती. इमारतीतील तळमजल्यावर असलेल्या कपड्याच्या गोदामाला ही आग लागली होती. अद्याप आगीचे कारण स्पष्ट नसून पोलीस तपास करत आहेत.
गेल्या दोन आठवड्यातील दिल्लीतील ही आगीची दुसरी मोठी घटना आहे. याआधी 8 डिसेंबरला उत्तर दिल्लीतील अनाज मंडीला लागलेल्या आगीत ४३ जणांचा मृत्यू झाला होता तर अनेकजण जखमी झाले होते.
  Print


News - World | Posted : 2019-12-23


Related Photos