आलापल्ली येथील दोन युवक प्राणहिता नदीत बुडाले


- एका युवकाचा मृतदेह गवसला तर दुसऱ्याचा शोध सुरू

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी :
तालुक्यातील आलापल्ली येथील दोन युवक देवलमरी नदीत बुडाले. यापैकी एका युवकाचा मृतदेह गवसला असून अन्य एका युवकाचा शोध सुरू आहे. सादर घटना रविवार, २२ डिसेंबर २०१९ रोजी उघडकीस आली आहे. आलापल्ली येथील महेश मादेशी व कुणाल म्हशाखेत्री हे दोन युवक  २१ डिसेंबर २०१९ रोजी  देवलमरी येथील नदी घाटावर फिरण्यासाठी गेले असता दोन्ही युवक घरी परत न आल्याची बातमी परिवारातील लोकांनी दिली. दोन्ही युवकांचा शोध घेण्याकरिता परिवारातील सदस्य आणि मित्र फिरत असता बेपत्ता युवकांची दुचाकी,चप्पल व कपडे देवलमरी नदीघाटावर सापडले. बेपत्ता युवक नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. अहेरी पोलिसांनी स्थानिकांची मदत घेऊन युद्धपातळीवर नावेच्या  सह्यायाने शोधमोहीम हाती घेतली असताना रविवारी दुपारच्या सुमारास कुणाल म्हशाखेत्री या युवकाचा मृतदेह प्राणहिता नदीच्या पात्रात मिळाला तर दुसऱ्याचा शोध घेतला जात आहे. बातमी लिहिस्तोवर शोध सुरु होता.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-12-22


Related Photos