जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार होणार अध्यक्ष ?


- कंकडालवार यांना बहुतांश जि. प. सदस्यांचा पाठींबा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
गडचिरोली जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीकडे सध्या संपूर्ण जिल्हावासियांचे लक्ष्य लागलेले असून जवळपास सर्वच पक्षाच्यावतीने जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी समिकरणे जुळविण्यात येत आहेत. सध्याचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार हे अध्यक्ष पदाचे प्रबळ दावेदार मानल्या जात असून त्यांना बहुतांश जिल्हा परिषद सदस्यांचा पाठींबा असल्याने कंकडालवार हे जिल्हा परिषद अध्यक्ष होणार असल्याची शक्यता जिल्हा परिषदेच्या वर्तुळात वर्तविली जात आहे. कंकडालवार हे सर्वांशी समन्वय साधून व सर्वांना जुळवून घेत जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासासाठी धडपडत आहेत. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांच्या नावाला फारसा कुणाचा विरोध नसल्याचे चित्र दिसून येत असल्याने अध्यक्ष पदाची खूर्ची मिळविण्याचा त्यांचा मार्ग सध्यातरी सूकर असल्याचे दिसून येत आहे.
ग्रामविकास विभागाच्या १० डिसेंबर २०१९ च्या पत्रान्वये जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी ३ जानेवारी २०२० रोजी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे विविध राजकीय पक्षांच्या वतीने अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी समिकरणे जुळविण्याच्या कामाला वेग आला आहे. ५१ सदस्यसंख्या असलेल्या गडचिरोली जिल्हा परिषदेत भाजपाचे २०, काॅंग्रसचे १५, आदिवासी विद्यार्थी संघाचे ७, राष्ट्रवादी काॅंग्रसचे ५, राष्ट्रीय समाज पक्ष २, ग्रामसभांचे २ असे पक्षीय बलाबल आहे. सद्यस्थितीत भाजपा-आविसं-राकाॅंची सत्ता असून भाजपाकडे अध्यक्ष व दोन सभापती, आविसंकडे उपाध्यक्ष व एक सभापती तर राकाॅंकडे एक सभापती पद देण्यात आले आहे. यामध्ये जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी कुणाचाही व्देष न करता सर्वांना सोबत घेउन जिल्हृयाच्या सर्वांगीण विकासाकरिता कसोसीने प्रयत्न करीत आहेत. ते संपूर्ण ५१ ही जिल्हा परिषद क्षेत्राला भेटी देवून त्या क्षेत्रातील समस्या जाणून घेत लोकांच्या अडीअडचणी प्राधान्याने सोडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. सर्वच जिल्हा परिषद सदस्यांच्या क्षेत्रांच्या विकासाला न्याय देत असल्याने कंकडालवार यांच्या रुपाने जिल्ह्याला दमदार नेतृत्व लाभल्याचा सूर उमटत आहे. कंकडालवार यांच्या वेगळ्या कार्यशैलीमुळे विकास कामांनाही वेग आला असून जिल्हा परिषदेच्या कामकामावर वचक निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची सूत्रे आल्यास या जिल्ह्याच्या विकासाला आणखी गती मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सध्याचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांना अध्यक्ष बनविण्यासाठी जवळपास सर्वच पक्षाचे पदाधिकारी व जिल्हा परिषद सदस्यांकडून होकार असल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात दिसून येत आहे. त्यामुळे कंकडालवार हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बनणार असल्याचे चित्र जवळपास स्पष्ट दिसून येत आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-12-21


Related Photos