घोटपाळी गावाजवळ नक्षल्यांकडून एका इसमाची गोळ्या झाडून निर्घृणपणे हत्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड :
तालुक्यातील नेलगुंडा परिसरात नक्षलवाद्यांनी बेदम मारहाण करून व बंदुकीच्या गोळ्या झाडून एका इसमाची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना शुक्रवार, २० डिसेंबर २०१९ रोजी सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून लोकांमध्ये नक्षल्यांची दहशत निर्माण झाली आहे. नक्षलवाद्यांनी एका इसमाची निर्घृणपणे हत्या करून त्याचे मृतदेह धोडराज ते घोटपाळी या मार्गावरील जंगल परिसरात फेकून देण्यात आल्याचे परिसरातील काही लोकांना दिसून आला. त्या मृतदेहावर नक्षल पत्रके टाकून ठेवण्यात आली होती. त्या पत्रकावर दलु परसा असे नाव लिहिलेले होते व तो २०१५ पासून एसपीओ म्हणून पोलिसाकारिता काम करीत असल्याचे नमूद केले आहे. सदर मृतक इसम कोणत्या गावाचा आहे हे अद्यापही पटले नाही. सदर इसमाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी भामरागड येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास भामरागड पोलिस करीत आहेत.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-12-20


Related Photos