दुकानात चोरी करणाऱ्या आरोपीस कारावासाची शिक्षा


- चंद्रपूर न्यायालयाचा न्यायनिर्णय

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर :
पोलिस स्टेशन चंद्रपूर शहर अंतर्गत दुकानात चोरी करणाऱ्या आरोपीस चंद्रपूर जेएमएफसी येथील कोर्ट विद्यमान नेहा रणवीर यांनी कारावासाची शिक्षा १८ डिसेंबर २०१९ रोजी ठोठावली आहे. नासीर खान हमीदखान पठाण (४२) रा. बगडखिडकी चंद्रपूर असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत हकीकत अशी की, पोलिस स्टेशन चंद्रपूर शहर अंतर्गत फिर्यादी गजानन दिनानाथ सोरते रा. श्रीराम वाॅर्ड चंद्रपूर हे २४ मार्च २०१२ रोजी आपली होर्डवेअरची दुकान बंद करून घरी गेले असता अज्ञात इसमाने त्यांच्या दुकानातील संरक्षण भिंतीमध्ये ठेवलेल्या ६ हजार रुपये किंमतीच्या १४० कि. ग्रॅ. वजनाच्या लोखंडी सळाखी चोरून नेल्या. याबाबत दिलेल्या तक्रारीवरून पोलिस स्टेशन चंद्रपूर शहर येथे अपराध क्रमांक ३२/२०१२ भादंवि कलम ३७९ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्हा तपासात घेतल्यानंतर तपासी अधिकारी तत्कालीन सहायक पोलिस उपनिरीक्षक शेख रउफ सेवानिवृत्त याने आरोपी नासीर खान हमीदखान पठाण या आरोपीविरुद्ध सबळ पुराव्यानिशी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयाने सुनावणी दरम्यान सदर प्रकरणात न्यायालयाने साक्षीदार तपासले व योग्य पुराव्याच्या आधारे १८ डिसेंबर २०१९ रोजी आरोपी नासीर खान हमीद खान पठाण यास ६ महिने शिक्षा व २ हजार रुपये दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास १ महिना शिक्षा कोर्ट विद्यमान नेहा रणवीर यांनी ठोठावली आहे. या प्रकरणात सरकारतर्फे चंद्रपूरचे सरकारी अभियोक्ता ॲड. प्रफुल बोहरा आणि कोर्ट पैरवी म्हणून पोलिस स्टेशन दुर्गापूर येथील नाईक पोलिस शिपाई मधुराज रामानुजमवार यांनी काम पाहिले.  Print


News - Chandrapur | Posted : 2019-12-19


Related Photos