सरकारी कर्मचाऱ्यास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या नक्षल आरोपीस १० वर्षांचा कारावास व ७ हजार रुपये दंडाची शिक्षा


- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्निल खटी यांचा न्यायनिर्णय

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
सरकारी कर्मचारी नाईक पोलिस शिपाई राकेश रामसु हिचामी यास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या नक्षल आरोपीस १० वर्षांचा कारावास व ७ हजार रुपये दंडाची शिक्षा गडचिरोली येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्निल खीट यांनी गुरुवार, १९ डिसेंबर २०१९ रोजी ठोठावली आहे. श्यामराव बुधू गोटामी (४०) रा. कारका (खु.), ता. एटापल्ली, जि. गडचिरोली असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या नक्षल आरोपीचे नाव आहे.
याबाबत हकीकत अशी की, फिर्यादी नाईक पोलिस शिपाई राकेश रामसु हिचामी हे ३० मे २०१७ रोजी विशेष अभियान पथक गडचिरोली येथे नेमणुकीस असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसह पोलिस स्टेशन जारावंडी हद्दीतील कारका जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान राबविून असताना यातील आरोपी नक्षलवाद्यांनी पोलिस पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना जिवे ठार मारून त्यांच्या जवळील हत्यार व दारूगोळा पळवून नेण्याच्या उद्देशाने कट रचून व गैरकायद्याची मंडळी जमवून त्यांच्याकडील बेकायदेशीर अग्नीशस्त्रातून पोलिस पथकावर अंधाधूंद गोळीबार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. यावर पोलिस पथकाने स्वसंरक्षणार्थ व प्रतिउत्तरादाखल गोळीबार कस्न नक्षलवाद्यांचा पाठलाग केला असता नक्षल आरोपी श्यामराव बुधू गोटामी हा सापडला असता आरोपीला अटक करून घटनास्थळावरील साहित्य ताब्यात घेवून पोलिस स्टेशन गडचिरोली येथे फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी व त्याच्या सहकारयाविरुद्ध अपराध क्रमांक १/२०१७ च्या भादंवि कलम ३०७, ३५३, १४३, १४७, १४८, १४९, १२० (ब) व मपोका १३५, भाहका ३/२५, भास्फाका ४, ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आाल.
सदर गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक नितीन मोहिते यांनी केला असून आरोपीस अटक करून तपासादरम्यान आरोपीकडून हत्यार हस्तगत करण्यात आला. आरोपीविरुद्ध सबळ पुरावा मिळून आल्याने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आला. सरकारतर्फे फिर्यादी व इतर साक्षीदारांचे बयाण तसेच सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने १९ डिसेंबर २०१९ रोजी गडचिरोली येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्निल खटी यांनी आरोपी श्यामराव बुधू गोटामी यास भादंविच्या ३०७ अन्वये १० वर्षे कारावासाची शिक्षा व ५ हजार रुपये दंड, कलम ३५३, १४९ अन्वये २ वर्षाची शिक्षा व १ हजार रुपये दंड, कलम १४८ अन्वये ३ वर्षाची शिक्षा व १ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. सरकार पक्षातर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील एस. यु. कुंभारे यांनी काम पाहिले.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-12-19


Related Photos