बसस्थानकावर बसची वाट पहात उभ्या असलेल्या तरुणीवर अ‍ॅसिडहल्ला : गोंदिया जिल्ह्यातील घटना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया :
जिल्ह्यातील मुंडीपार गावात बसस्थानकावर बसची वाट पहात उभ्या असलेल्या तरुणीवर अज्ञात आरोपीने काल बुधवारी सकाळच्या सुमारास  अ‍ॅसिड फेकल्याची घटना घडली. दुचाकी वाहनावरून दोन तरुण या पिडित मुलीच्या जवळ आले. त्यांनी तिच्या अंगावर अ‍ॅसिड फेकले आणि तात्काळ फरार झाले. काय घडले हे कळायच्या आतच त्यांनी तेथून पळ काढला. पीडित तरुणी हि  नागपुरात शिक्षण घेत असून ती कॉलेजला जाण्यासाठी निघाली असताना ही घटना घडली. या तरुणीचे शरीर अ‍ॅसिडने भाजले असून तिला नागपूरला उपचारासाठी पाठवण्यात येत आहे. दरम्यान कुठल्या कारणाने अज्ञानाने सदर मुलीवर अ‍ॅसिड फेकले व ते कोण होते  याचा शोध पोलीस घेत आहे . या घटनेमुळे  परिसरात भीतीचे वातावरन निर्माण झाले आहे .   Print


News - Gondia | Posted : 2019-12-19


Related Photos