ओल्या दुष्काळामुळे विदर्भातील शाळांचे शुल्क व परीक्षा शुल्क माफ करण्यात यावे


- नागपूर विभागाच्या शिक्षण उपसंचालकांची अप्पर मुख्य सचिवांकडे मागणी

- विदर्भ राज्य आघाडीच्या मागणीची घेतली दखल

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
विदर्भात सततच्या पावसामुळे शेतकरी वर्गाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. विदर्भातील शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी हे बहुतांश शेतकरी  कुटुंबातील असल्याने या नुकसानीमुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बिघडलेली आहे. त्यात महामाईचा विचार करता गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरित परिस्थिती परिणाम होण्याची शक्यता टाळता येत नाही. त्यामुळे विदर्भ राज्य आघाडी संघटन केंद्रीय कार्यालय नागपूरने ओल्या दुष्काळामुळे शाळेचे शुल्क व परीक्षा शुल्क माफ करण्याची मागणी केली होती. या मागणीच्या अनुषंगाने नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक सतीश मेंढे यांनी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय महाराष्ट्र राज्य मुंबईचे अप्पर मुख्य सचिव यांच्याकडे विदर्भातील शाळांचे शुल्क व परीक्षा शुल्क माफ करण्याची मागणी एका पत्राद्वारे केली आहे.
विदर्भातील शाळांनी शैक्षणिक शुल्क माफ करून सरसकट सर्व विद्याथ्र्यांना परीक्षेस बसण्याची परवानगी देण्यात यावी व परीक्षेला लागणारे शुल्क देखील माफ करण्यात यावे, असे निवेदन विदर्भ राज्य आघाडी या संघटनेने सादर केलेले आहे. सदर बाब ही शासन स्तरावरील असल्यामुळे सदरचे निवेदन पुढील कार्यवाहीकरिता नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक सतीश मेंढे यांनी अप्पर मुख्य सचिवांना सादर केले आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-12-19


Related Photos