नराठीटोला येथे स्वच्छता व अंधश्रद्धा निर्मूलनावर सादर केली दंडार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / सडक अर्जुनी :
तालुक्यातील  नराठीटोला येथे गणेशोत्सवानिमित्त दुर्गा दंडार मंडळ पुतळी च्या संपूर्ण कलाकारांनी संपूर्ण गाव सफाई व अंधश्रद्धा निर्मूलन यावर आधारित दंडार सादर करून नागरिकांना जागृत केले .  
सडक-अर्जुनी तालुक्यामधील एक दुर्गम भागांमध्ये असलेला गाव नराठीटोला हा गाव तालुक्यापासून वीस किलोमीटर अंतरावर जंगली भागामध्ये  वसलेला असून  वीस ते पंचवीस घरांची वस्ती आहे.  संपूर्ण आदिवासी लोक या गावांमध्ये वास्तव्य करीत आहेत आणि ह्या गावामध्ये सर्व लोक संगमताने आपला सह जीवन जगत आहेत.  गावामध्ये कृष्ण जयंती सार्वजनिक केली.  आज पर्यंत एक गाव एक गणपती एकला असेल पण एक गाव एकच कृष्ण असा फार कमी ऐकायला मिळाला असेल कृष्ण जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली .  आता गणेश मूर्तीची सुद्धा स्थापना केली आहे.  नराठी टोला गणेश मंडळाचे अध्यक्ष शिवचरण ,सचिव संजय वरखडे, आनंद खंडाते यांनी गावातील वर्गणी गोळा करून दररोज कार्यक्रम घेतात .  
गणेशोत्सवानिमित्त  दुर्गा दंडार मंडळ पुतळी च्या कलाकारांनी दंडार सादर केली .दंडार  संपूर्ण गाव सफाई व अंधश्रद्धा निर्मूलन यावर आधारित होती अलीकडे दंडार ही नाम शेष होण्याच्या तयारीत आहे  परंतु दुर्गा मंडळाने ही परंपरा टिकवून ठेवलेली आहे.  या  दंडारच्या सर्व सदस्यांना प्रमाणपत्र पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते वितरित केले होते आणि या खेड्यातील कलावंतांना समोर चालना मिळावी असे गणेश मंडळाचे अध्यक्ष यांनी भाषणामध्ये व्यक्त केले .   Print


News - Gondia | Posted : 2018-09-18


Related Photos