जावईचा सासरा, सासू व पत्नीवर चाकूहल्ला


- सासरा ठार तर सासू व पत्नी जखमी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सावली :
जावयाने सासरा, सासू व पत्नीवर चाकूने हल्ला केला. यात सासरा ठार झाला असून सासू व पत्नी गंभीररित्या जखमी झाल्याची खळबळजनक घटना सावली तालुक्यातील हिरापूर येथे १६ डिसेंबर २०१९ रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे. आरोपी जावई नीलकंठ कांबळे रा. हिरापूर याने सासरा, सासू व पत्नीवर चाकूने हल्ला केला. यात सासरा ईश्वर मडावी ठार झाला असून सासू कौशल्या ईश्वर मडावी, यामिना ईश्वर मडावी व पत्नी मनीषा कांबळे हे तिघेजण जखमी झाले असून त्यांना गडचिरोली येथील रुग्णालयात भरती केले आहे. आरोपी नीलकंठ कांबळे हा फरार असून सावली पोलीस या घटनेची चौकशी करीत आहेत.  Print


News - Chandrapur | Posted : 2019-12-17


Related Photos