प्रियदर्शनी चौकात १४ लाख २२ हजार रुपयांचा दारूसाठा जप्त, एका आरोपीला अटक


- स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरची कारवाई

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर :
स्थानिक गुन्हे शाखेच्या चंद्रपूर पथकाने प्रियदर्शनी चौकात १५ डिसेंबर २०१९ रोजी १४ लाख २२ हजार ६०० रुपयांचा दारूसाठा जप्त केला. यावेळी एका आरोपीला अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या व विकणाऱ्या दारू तस्करांचे धाबे ददणाणले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथ्क पोलिस स्टेशन रामनगर परिसरात १५ डिसेंबर रोजी पेट्रोलिंग करीत असताना पडोली ते चंद्रपूरकडे दोन इसम एका चारचाकी फोर्ड फिएस्टा वाहनाने अवैधरित्या दारूची वाहतूक करीत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीवरून वरोरा नाका चौक येथे नाकाबंदी लावून संशयित वाहनास थांबविण्याचा प्रयत्न केला असता, चालकाने वाहन न थांबविता भरधाव वेगाने घेवून गेला. सदर वाहनाचा पाठलाग करून वाहनास प्रियदर्शनी चौक येथे ताब्यात घेवून वाहनाची झडती घेतली असता वाहनात एका इसमाच्या ताब्यात असलेला ९ लाख २१ हजार ६०० रुपये किंमतीची ४६ बाॅक्स ऑफीसर चाॅईस विदेशी दारू, दारू वाहतुकीकरिता वारलेली ५ लाख रुपये किंमतीची फोर्ड फिएस्टा वाहन (क्र. एमएच १२ ईजी १७३६) आणि १ हजार रुपये किंमतीचा एक मोबाईल फोन असा एकूण १४ लाख २२ हजार ६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल सापडला. सदर मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला व आरोपी शेख वसिम शेख शहाबुद्दीन (28) रा. आनंदनगर, वर्धा यास अटक करण्यात आली असून पुढील तपास रामनगर पोलिस करीत आहेत. सदर कारवाई चंद्रपूरचे पोलिस अधीक्षक डाॅ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक बोबाडे, सहायक फौजदार संगीडवार, पोलिस नाईक अमजद, पोलिस शिपाई संदीप मुळे, प्रशांत नागोसे, विनोद जाधव यांनी केली आहे.  Print


News - Chandrapur | Posted : 2019-12-16


Related Photos