राहूल गांधींना सावरकरांविषयीची पुस्तके भेट द्यावी : संजय राऊत यांचा काँग्रेसच्या नेत्यांना सल्ला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेऊन सावरकरांविषयीचे त्यांचे गैरसमज दूर करावेत, त्यांना अनुवादित पुस्तक भेट द्यावं, असा सल्ला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. राहुल गांधींनी सावरकरांविषयी केलेल्या वक्तव्यानंतर शिवसेना आक्रमक झाली होती.
वीर सावरकारांचा विषय हा स्वतंत्र आहे. एखादा नेता कोणाविषयी काय बोलतो, यावर हे सरकार टिकणार की नाही, हे अवलंबून नाही. सरकार अन्न वस्त्र निवारा, आरोग्य, शिक्षण, रोजगार, सामाजिक न्याय, इन्फ्रास्ट्रक्चर या प्रमुख विषयांवर काम करत आहे, असं राऊत यांनी म्हटलं आहे.
सावरकरांसारखा त्याग करण्यासाठी वाघाचं काळीज लागतं. वीर सावरकरांबद्दल मनमोहन सिंह यांनीही दोन महिन्यांपूर्वी वक्तव्य केलं होतं. सावरकरांची विचारधारा, भूमिका पटत नसतीलही, पण त्यांनी केलेला त्याग हा मोलाचा आहे, हे मनमोहन सिंह यांनी मान्य केलं होतं, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, भाजपला सावरकरांविषयी पुळका आहे, हे ढोंग आहे. साडेपाच वर्ष केंद्रात तुमचं सरकार आहे. मी सतत वीर सावरकारांना 'भारतरत्न' जाहीर करा, अशी मागणी करतोय. पण तुम्ही काय केलं ? असा प्रश्नही संजय राऊत यांनी विचारला.
  Print


News - Rajy | Posted : 2019-12-15


Related Photos