खेळांमुळे विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास घडतो - जि. प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार


- जोगनगुडा येथे केंद्रस्तरीय बालक्रीडा सम्मेलनाचे थाटात उद्घाटन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी :
विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत खेळाकडे सुध्दा लक्ष दिले पहिजे. खेळल्यामुळे शारीरिक विकास साधतो व मानसिकता प्रबळ बनते. खेळ हि एक शारीरिक कला आहे. दररोज किमान अर्धा ते एक तास खेळ खेळला पाहिजे. खेळामुळे चपळता वाढते सोबतच आपला व्यक्तिमत्व विकासही घडतो. शिक्षणासारखाच्या खेळातसुध्दा प्राविण्य प्राप्त करण्यासाठी चपळता व हुशारी सोबतच नाविन्यपूर्ण खेळाच्या उपयोग केल्यास निश्चितच एक चांगला खेळाडू बनण्यास वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी केले. अहेरी पंचायत समिती अंतर्गत बालक्रिडा व कला सम्मेलन सुरू असून शुक्रवार, १३ डिसेंबर २०१९ रोजी राजाराम-उमानूर केंद्राचे केंद्र संमेलन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जोगनगुडा येथे आयोजित करण्यात आले. सदर बालक्रिडा सम्मेलनाच्या उद्घाटन जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते दीप व मशाल प्रज्वलित करून करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
या क्रिडा संमेलनाच्या अध्यक्षस्थानी अहेरी पंचायत समितीच्या सभापती सुरेखा आलाम होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, पंचायत समिती सदस्य भास्कर तलांडे, पंचायत समिती सदस्या शारदा कोरेत, खांदलाच्या सरपंच शंकुतला कूळमेथे, गटशिक्षण अधिकारी श्रीमती एन. वैद्य, शा. व्य. स. चे व्येंकटी डोंगरे, सदस्य बापू बेडकी, माजी सरपंच हंनमतू कोरेत, शामराव गावडे, बबलू शेख, ग्रा.प. सदस्य श्रीनिवास मडावी, उपसरपंच सुरेश कुळमेथे, बापू गांधार्ला, माजी सरपंच परशुराम नैनी, जयराम आत्राम, तिरुपती मेन्डा, आनंदराव तलांडे, इरसाद शेख व केंद्रातील सरपंच व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मंचावर उपस्थित होते. अजय कंकडालवार पुढे म्हणाले की, प्रत्येक शाळेला इमारतीसाठी सुध्दा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून लवकरच नवीन इमारती बांधकाम करण्यात येतील व दुरुस्ती सुध्दा करण्यात येतील, अशी ग्वाही दिली. या कार्यक्रमाचे संचालन अनिल बंडावार तर आभार प्रदर्शन श्रीमती चव्हाण यांनी केले. यावेळी सम्मेलनाच्या यशस्वीतेसाठी केंद्रप्रमुख एस. आईचवार, देशपांडे, केंद्रातील शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी उपस्थित होते. केंद्रातील आठ शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे झांकी प्रदर्शन सादर करून मान्यवंराचे मने जिंकून घेतले.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-12-13


Related Photos