घरात घुसून चाकूने मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीस ३ वर्षे कारावास व ९ हजार रुपये दंडाची शिक्षा


- जखमींना १० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश

- प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी बोरफळकर यांच्या न्यायालयाचा न्यायनिर्वाळा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
चाकू घेवून घरात घुसून जिवे मारण्याची धमकी देणारया आरोपीस ३ वर्षांचा कारावास व ९ हजार रुपये दंडाची शिक्षा प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी एन. सी. बोरफळकर यांच्या न्यायालयाने गुरुवार, १२ डिसेंबर २०१९ रोजी सुनावली आहे. तसेच तसेच या प्रकरणातील जखमींना १० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेशही देण्यात आले आहे. मनोहर पचारे (३४) रा. पोलिस संकूल पोलिस मुख्यालय गडचिरोली असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत सविस्तर असे की, १२ ऑक्टोबर २०१६ रोजी आरोपी मनोहर पचारे याने फिर्यादीच्या घरात चाकू घेऊन घुसला व जोरजोराने ओरडून फिर्यादीला मारण्याची धमकी दिली. फिर्यादी घाबरून आपल्या वहिनीला आवाज दिला. तेव्हा ती घरी आली व चाकू हिसकाविण्याचा प्रयत्न केला. परंतु आरोपी चाकू सोडत नसल्याने कसेतरी करून त्याच्या हातातून चाकू हिसकावून त्याला घराबाहेर काढले. याबाबत फिर्यादीने पोलिस स्टेशन गडचिरोली येथे तक्रार दिली. यावरून अपराध क्रमांक १९६/२०१६ च्या भादंवि कलम ४५२, ५०६, भाहका सहकलम ४/२५ अन्वये १२ ऑक्टोबर २०१६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हयाचा तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक धनंजय पत्रे यांनी तत्कालीन पोलिस निरीक्षक विजय पुराणिक यांच्य मार्गदर्शनाखाली करुन  दोषरोपपत्र  न्यायालयात दाखल केला. गुरुवार, १२ डिसेंबर २०१९ रोजी प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी एन. सी.  बोरफळकर यांच्या न्यायालयाने आरोपीविरुद्ध सबळ साक्ष पुरावा मिळून आल्याने आरोपी मनोहर पचारे यास कलम ४५२ अन्वये २ वर्षे कारावास व ३ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ६ महिने साधा कारवास, कलम ५०६ अन्वये २ महिने साधा कारावास व १ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास २ महिने साधा कारावास तसेच भाहका ४/२५ अन्वये ३ वर्षे साधा कारावास व ५ हाार रुपये दंड व दंड न भरल्यास १० महिने साधा कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच दोन्ही जखमींना प्रत्येकी ५ हजार रुपये नुकसान भरपाई १५ दिवसांच्या आत देण्याचा आदेश देण्यात आला आहे. सरकारी पक्षातर्फे सहाययक सरकारी अभियोक्ता अमर फुलझेले यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून यशवंत मलकाम व कोर्ट मोरर म्हणून सुभाष सोरते यांनी काम पाहिले.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-12-12


Related Photos