नगरसेवक प्रमोद पिपरे यांच्या वाढदिवसानिमित्त १३ डिसेंबरला कार्यक्रम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली नगर परिषदेचे नगरसेवक व भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा महाराष्ट्र प्रांतिक तेली महासंघाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रमोद पिपरे यांचा वाढदिवस शुक्रवार, १३ डिसेंबर २०१९ रोजी दुपारी १२.३० वाजता स्थानिक नगर परिषद कार्यालयात केक कापून साजरा करण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता स्थानिक आरमोरी मार्गावरील सुप्रभात मंगल कार्यालयात तेली समाजाच्या वतीने सत्कार व शुभेच्छा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन नगर परिषदेचे सभापती, नगरसेवक, तेली समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मित्र परिवार गडचिरोलीच्यावतीने करण्यात आले आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-12-12


Related Photos